शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शेती उपयोगी साधनांच्या भाववाढीने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

वणी तालुक्यातील शेतीत खरिपात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढणीसाठी मागेल ती मजुरी देऊन बाहेर गावावरून मजूर आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

ठळक मुद्देखतांच्या किमतीत झाली तब्बल १७.३४ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : लहरी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीज पुरवठा, अल्प प्रमाणात मिळणारे बँक पीक कर्ज आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेती बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. दरवर्षी शेती उपयोगी साधनांच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहेत. यामुळे शेती कशी करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.वणी तालुक्यातील शेतीत खरिपात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढणीसाठी मागेल ती मजुरी देऊन बाहेर गावावरून मजूर आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी -बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमती वाढत आहे. यंदा १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति ५० किलोच्या बॅग मागे १७.३४ टक्के वाढ केली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. डिझेलच्या किमती वाढत असल्याने ट्रॅक्टरद्वारा पीक काढणी, मळणीसह शेत मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. विजेची दरवाढ डोईजड होत आहे. दरवर्षी शेतपिकांच्या उत्पादन खर्चात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमी भाव मिळत नाही. संपूर्ण शेतमालाची शासकीय हमीभावात सीसीआय किंवा नाफेड यंत्रणेकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. म्हणून शेती व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन शासनाने शेतकरी हिताचे रक्षण करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

निसर्गाची थट्टा सुरूच एकीकडे शेती व्यवसाय धाेक्यात आला असताना दुसरीकडे निसर्गाचे बदलणारे चक्रदेखिल शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. कधी अति पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

व्यवस्थेच्या दृष्टचक्रात शेतकरी पिचला जात आहे. यावर्षी कर्जमाफी नाही, पीक विमा नाही, खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट सुरू आहे. परजिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याने स्थानिक मजुरांनी भरमसाठ मजुरी वाढविली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?                       - जयसिंग गोहोकार, शेतकरी नेते. वणी.

 

टॅग्स :agricultureशेती