कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:44 IST2017-09-02T20:44:05+5:302017-09-02T20:44:34+5:30

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार कोलमडत असल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीसाठी जागली करावी लागत आहे.

Farmers are aware of the debt waiver application | कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली

कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली

ठळक मुद्देइंटरनेट सेवा खंडित : उमरखेड तालुक्यात २२ ई-सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार कोलमडत असल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीसाठी जागली करावी लागत आहे.
राज्य शासनाने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे ई-सेवा केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होत आहे. मात्र, अनेक शेतकºयांचे आधारकार्ड अपडेट नसल्याने त्यांची निराशा होत आहे. अशा शेतकºयांना आधार नोंदणीसाठी बाहेर तालुक्यात जावे लागत आहे. इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरणे कठीण झाले आहे. तालुक्यातील मरसूळ येथील ई-सेवा केंद्रात शेतकºयांना दिवस-रात्र बसून वाट बघावी लागत आहे. तांत्रिक अडचण येत असल्याने जिल्हा व विभागीय प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ई-सेवा केंद्राच्या कर्मचाºयांना कंपन्यांनी मानधन दिले नाही. त्यामुळे माधव चौधरी नामक केंद्र चालकाने अखेर उमरखेड तहसीलसमोर उपोषणही केले होते. तालुक्यातील २२ ही केंद्र चालकांवर हीच वेळ ओढवली आहे. त्याचा नाहक त्रास शेतकºयांना होत आहे. मरसूळ हे सहा हजार लोकसंख्येचे गाव असून, तेथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांना कर्जमाफीचे अर्ज भरणे कठीण झाले आहे. ई-केंद्र चालक संजय बनसोड शेतकºयांना सहकार्य करतात. मात्र, इंटरनेटसेवा खंडित होत असल्याने शेतकºयांना जागली करावी लागत आहे.
आधारसाठी कसरत
तालुक्यात २२ ई-सेवा केंद्र आहेत. या सर्वांना आधार नोंदणीची परवानगी देण्याची मागणी आहे. आधारकार्ड अपडेट नसल्याने अनेक शेतकºयांवर कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ ओढवली आहे. त्यासाठी या २२ ही केंद्रांना आधार नोंदणीची दारे मोकळी करून द्यावी, अशी अपेक्षा जिनिंग प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंतराव कदम यांनी व्यक्त केली.

Web Title: Farmers are aware of the debt waiver application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.