शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:28 AM2021-06-10T04:28:05+5:302021-06-10T04:28:05+5:30

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

Farmers, agricultural centers will be hit by the closure of fertilizer loans | शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

Next

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. खताच्या भरवशावर हा व्यवसाय चालतो. त्यामुळे यात काही व्यावसायिक, तसेच याचा फायदा घेत काहींकडून मनमानी झाल्यास शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. कृषी केंद्रांचा व्यवसाय जास्त प्रमाणात उधारीवर चालतो. शेतकऱ्यांकडील वसुलीच्या भरवशावर पुढील हंगामाचे नियोजन केले जाते; परंतु सतत दोन हंगामात कोरोनामुळे वसुली अडकून पडल्याने रासायनिक खते, बियाणांची बुकिंगची टक्केवारी घसरल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

तालुक्यात एकूण ७२ कृषी केंद्रे आहेत. या हंगामी व्यवसायाकरिता खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यासाठी लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून बियाणे आणि खतांचे मिळून प्रत्येकी जवळपास १५ ते ४० लाखांपर्यंत बुकिंग केले जाते. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांसह विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा समावेश असतो. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आजाराची भीती, सतत संचारबंदी, लाॅकडाऊन आदींमुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी केंद्राच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला.

पूर्वी रासायनिक खते गोडाऊन स्कीमवर क्रेडिटवर मिळत होते. उन्हाळ्यात खरेदी केल्यानंतर २१ ते ३० जूनपर्यंत पेमेंट देण्याची सवड मिळायची. त्यामुळे जवळपास सर्वच कृषी केंद्रात खत येत होते. मे महिन्यात, तसेच जूनमध्ये बियाणासोबतही खताची विक्री होत होती. त्यात पैसे वसूल होत असल्याने कृषी केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थित चालत होते.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची गरज

आता एक रुपयाचेही खत उधारित मिळत नाही. गोडाऊन स्कीम बंद झाली. एक ट्रक घ्यायचा म्हणजे पाच लाख रुपये नगदी भरावे लागतात. त्यावर पाच हजारांचा नफा मिळतो. फेब्रुवारीपासून तेवढे पैसे अडकून पडल्यास त्याचे व्याजही भरून निघणे मुश्कील आहे. यामुळे नगदी खताची खरेदी करून चार महिने वागवायचे आणि आता जूनमध्ये विक्री करायची, हे छोट्या व्यावसायिकांना शक्य झाले नाही. आता खरेदी करायची म्हटले, तर रॅक लागत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काहींकडून खते, बियाणांच्या खरेदीत मनमानी केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची, तसेच या व्यवहारावर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोट

बियाणे, खते व इतर साहित्याच्या व्यवहारांकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांची फसवणूक किंवा मनमानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तरीसुद्धा काही अडचण, तक्रार असल्यास संपर्क साधावा.

राजीव शिंदे, गटविकास अधिकारी, दारव्हा

Web Title: Farmers, agricultural centers will be hit by the closure of fertilizer loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.