शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंमधून साकारले फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:03 IST

बियाण्यांचे चढे दर, उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे पैसा वाचविण्याच्या हेतूने हरीश यांनी टाकाऊ वस्तूपासून चक्क फवारणी यंत्र तयार केले आहे.

अशोक पिंपरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील रिधोरा येथील प्रयोगशील युवा शेतकऱ्याने जुगाड टेक्नॉलॉजीतून फवारणी यंत्र तयार केले आहे. त्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग केला आहे. गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीतून त्यांनी फवारणी यंत्र साकारले आहे.हरीश मारोतराव काळे (४३) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बीकॉम द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झालेले हरीश यांनी आपल्या राळेगाव-वडकी रोडवरील रिधोरा येथील आठ एकर शेतीत विविध प्रयोग राबविले. शेतीतून अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचाच प्रयत्न हरीश करीत आहे. बियाण्यांचे चढे दर, उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे पैसा वाचविण्याच्या हेतूने हरीश यांनी टाकाऊ वस्तूपासून चक्क फवारणी यंत्र तयार केले. पाठीवर पंप घेवून फवारणी करणे अवघड जात असल्याने त्यांनी लोखंडी पाईप, प्लास्टिक पाईप, नोझल आणि एका दुचाकीचे चाक यापासून बॅटरीवर रिचार्ज होणारे फवारणी यंत्र तयार केले.

अत्यल्प खर्चात पाच तास फवारणीया यंत्रासाठी अत्यल्प खर्च आला. या यंत्राद्वारे तब्बल पाच तास फवारणी केली जाऊ शकते. तणनाशक, कीटकनाशक, प्रवाहीत खते, टॉनिक आदींची फवारणी करण्याची क्षमता या यंत्रात आहे. एक एकरातील पीक केवळ तास भरात फवारणी केले जावू शकते. यामुळे काम सोपे होवून मजुरीचा खर्चसुद्धा वाचतो. हरीशने बनविलेल्या या फवारणी यंत्रणाची पंचक्रोशीत चर्चा आहे. तो शेतीत सातत्याने नवीन प्रयोग करीत असतो. त्याच्या या प्रयोगाची दखल घेवून उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी यांनी भेट देवून त्यांचे कौतुक केले.शेतीत विविध प्रयोगयुवा शेतकरी हरीश काळे आपल्या शेतीत विविध प्रयोग राबवितात. यापूर्वी त्यांनी शेतात कडकनाथ कोंबडीचे अंडे यंत्राद्वारे उगविले होते. त्या यंत्राची उगवण क्षमता ६० टक्के होती. मधुमक्षी पालन, गोट फार्म, रसवंती आदी प्रयोग त्यांनी केले. बेरोजगारीवर मात करून त्यांनी शेतीत लक्ष घातले. ‘वनामती’ येथे त्यांनी विविध प्रशिक्षण घेतले. प्रयोग करणे हा त्यांचा छंद आहे. ते शेतात कापूस, सोयाबीन, केळी, ऊस आदी पिके घेतात. रिधोरा परिसर व राळेगाव तालुक्यात प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ते ओळखले जातात.

टॅग्स :FarmerशेतकरीJara hatkeजरा हटके