शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

By admin | Published: December 22, 2014 10:56 PM2014-12-22T22:56:34+5:302014-12-22T22:56:34+5:30

वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता

Farmer suicidal session stops | शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना

Next

गणेश रांगणकर - नांदेपेरा
वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या ही चितेंची बाब आहे. मात्र अद्याप आम्तहत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडतच आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांचे कुटुंबही मरणयातना सोसत आहे. कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी, मुले, त्यांचे होणारे हाल, हे कुणालाच दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अजूनपर्यंत शासन व प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी जिवंत असताना त्याला घर संसार चालविणे, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा एकाहून एक समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. शेतकरी एकेक समस्या दूर करण्याकरिता बँक, सावकारांकडून कर्ज काढतो. मात्र ते कर्ज कमी न होता दरवर्षी वाढतच जाते. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. परंतु शासन व प्रशासन जिवंत शेतकऱ्याला मदत करीत नाही. त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला ‘शेतकरी आत्महत्या’ असे गोंडस शिर्षक देऊन शासन व प्रशासन खडबडून जागे होते. त्यांचा कुटुंबाला भेट देते. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्तही होते. ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर आता अनेक लोकप्रतिनिधी राजकारणही करताना दिसतात. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची प्रचंड अवहेलना होते. आमचीच माती अन् आमचाच बळी, आमचेच हाल, अशी भावना त्या कुटुंबाची होते. मात्र मदत करायला हात पुढे येतच नाही. चार दिवस दुख: व्यक्त केल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडतो.

Web Title: Farmer suicidal session stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.