आकोली येथे शेतकऱ्यावर हल्ला

By Admin | Updated: May 6, 2016 02:23 IST2016-05-06T02:23:21+5:302016-05-06T02:23:21+5:30

पांढरकवडा : तालुक्यातील आकोली (खु.) येथील शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला.

Farmer attack in Akoli | आकोली येथे शेतकऱ्यावर हल्ला

आकोली येथे शेतकऱ्यावर हल्ला

पांढरकवडा : तालुक्यातील आकोली (खु.) येथील शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
रानडुकराने अचानक केलेल्या या हल्ल्यात बाबाराव पुंडलिक हमंद हे ६५ वर्षीय शेतकरी जखमी झाले. त्यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दादाराव हमंद नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी बैल चारण्यासाठी शेतात गेले होते. शेतात पोहोचल्यानंतर १०-१५ मिनीटे होताच रानडुक्करांचा कळप शेतात घुसला. त्यातील एकाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हमंद जंभीर जखमी झाले. शेजारील दुसऱ्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा रानडुकरांनी तेथून पळ काढला. तालुक्यात मोठ्या प्राण्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नदी-नाले कोरडे पडले. जंगलातील प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी आता गाववस्त्यांकडे धाव घेतली आहे. वन्यप्राण्यांचे कळप गावावस्त्यंमध्ये शिरकाव करून शेतकऱ्यांसह जनावरांवर हल्ला करीत आहे. आता शेतकऱ्यांवरच वन्यप्राणी हल्ला करीत असल्यामुळे जंगल परिसराला लागून असलेल्या गावातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय झोटींग यांनी जखमी शेतकऱ्यास रूग्णालयात तातडीने दाखल करण्यासाठी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer attack in Akoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.