भरधाव दुचाकी बसवर आदळली
By Admin | Updated: June 15, 2015 02:31 IST2015-06-15T02:31:27+5:302015-06-15T02:31:27+5:30
रुग्णालयात दाखल असलेल्या मामीचा डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाची भरधाव दुचाकी एसटी बसवर आदळल्याने ...

भरधाव दुचाकी बसवर आदळली
तरुण ठार : दारव्हा मार्गावरील तिवसाजवळ सकाळची घटना
बोरीअरब : रुग्णालयात दाखल असलेल्या मामीचा डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाची भरधाव दुचाकी एसटी बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला. हा अपघात यवतमाळ-दारव्हा मार्गावरील तिवसाजवळ रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.
अजय विष्णू बठे (१५) रा. मोझर ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. तो दुचाकी क्र.एम.एच.२९-ए.क्यू-६४७३ ने घरुन पहाटे ५.४५ वाजता निघाला. यवतमाळकडे जात असताना तिवसा गावाजवळ समोरुन येणाऱ्या यवतमाळ-लातूर या एसटी बसची जबर धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा चुराडा होऊन बसच्या समोरील भागात शिरली. यात अजय जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अजयच्या मागे आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ आहे. (वार्ताहर)