बँड व्यावसायिकांचे कुटुंब अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:17+5:30

हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरात पैसा नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

The family of the band professionals in trouble | बँड व्यावसायिकांचे कुटुंब अडचणीत

बँड व्यावसायिकांचे कुटुंब अडचणीत

ठळक मुद्देचार महिन्यांपासून काम थांबले : कामगारांवरही उपासमारीची वेळ, हाताला काम नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. याचा फटका बँड व्यावसायिक व कामगारांना बसला आहे. जिल्ह्यातील २५ हजारावर कुटुंब अडचणीत आले आहे. यासंदर्भात विविध मागण्या घेऊन या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरात पैसा नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्त्वात पुन्हा निवेदन देण्यात आले. प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना बँड असोसिएशन यवतमाळचे अध्यक्ष देवेंद्र वानखडे, प्रकाश कळणे, पप्पू वानखडे, चिंटू वानखडे, मदन तेलंग, राहुल तेलंग, अक्षय ससाने, दिलीप जाधव, दिलीप तेलंग, भारत खडसे, रोशन पाटील, दद्दू तेलंग, संजय पहेलवान आदी उपस्थित होते.

व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या
यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश व्यवसाय सुरू झाले आहे. बँड व्यावसायिकांनाही व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. धार्मिक कार्यक्रमात पाच ते सात व्यक्तींना बँड वाजविण्याची मुभा देण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: The family of the band professionals in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.