स्टेट बँकेच्या खजिन्यात नकली नोटा
By Admin | Updated: February 12, 2016 02:57 IST2016-02-12T02:57:02+5:302016-02-12T02:57:02+5:30
चलनात मोठ्या प्रमाणात नकली नोटा आहेत, याचा सामान्य नागरिकांना बऱ्याचदा फटकाही सहन करावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे स्टेट बँकही यातून सुटलेली नाही.

स्टेट बँकेच्या खजिन्यात नकली नोटा
शहर ठाण्यात गुन्हा : रिर्झव्ह बँकेने पाठविल्या परत
यवतमाळ : चलनात मोठ्या प्रमाणात नकली नोटा आहेत, याचा सामान्य नागरिकांना बऱ्याचदा फटकाही सहन करावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे स्टेट बँकही यातून सुटलेली नाही. बँकेच्या खजिन्यामध्ये शंभराच्या चक्क १६ नोटा आढळून आल्या. या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली आहे.
चलनातील नकली नोटा ही सर्वांसाठीच डोकेदुखी ठरलेली आहे. सामान्य व्यक्ती बँकेत रोख जमा करण्यासाठी गेला असता त्यामध्ये एखादी नकली नोट आढळल्यास काही सांगण्याच्या अगोदरच बँक कर्मचारी ती फाडून टाकतो. मात्र आता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत नकली नोटा आढळून आल्या. जुन्या नोटा रिर्झव्ह बँक आॅफ इंडियाच्या नागपूर येथील शाखेत पाठविण्यात आल्या. २३ नोव्हेंबर रोजी हा खजिना रवाना करण्यात आला. शंभराच्या १६ नोटा नकली असल्याने त्या नोटा स्टेट बँकेच्या यवतमाळ शाखेकडे परत पाठविण्यात आल्या. याप्रकरणी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील धनंजय थानथराटे यांनी शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. (कार्यालय प्रतिनिधी)