शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:09 IST

१९ ला महिला तंत्रनिकेतनमधील चार केंद्रांवर होणार मतदान : यवतमाळ विधानसभा क्षेत्रात ईडीसी चालणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान करता येणार आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदारांची संख्या पाहता मतदानासाठी तीन दिवस मतदानाची सुविधा राहणार आहे. उपविभागीय कार्यालयात तशी व्यवस्था असणार आहे. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान या ठिकाणी मतदान करता येणार आहे.

यवतमाळमधील उपविभागीय कार्यालयात आणि धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यातील धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये चार केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता परजिल्ह्यातील मतदार, यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील महिला मतदार, पुसद आणि दिग्रस विधानसभा क्षेत्रातील मतदार, त्याचप्रमाणे राळेगाव, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्रातील मतदार असे चार स्वतंत्र बूथ धामणगाव मार्गावरील महिला तंत्रनिकेतनमध्ये उभारले आहेत. या ठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. आणि याच ठिकाणी १९ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. या प्रत्येक मतदान बूथची क्षमता २०० मतदारांच्या मतदानाची आहे. यासोबत ४७५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी उपविभागीय कार्यालयात मतदान केंद्र उभारलेले आहे. या ठिकाणी १७, १८ तसे १९ नोव्हेंबरला मतदान करता येणार आहे. 

केवळ पोस्टल मतदानाला परवानगी यवतमाळ विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानानेच मतदान करता येणार आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रात ईडीसी सर्टिफिकेटच्या माध्यमातून होणारे मतदान करण्यास यावेळी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यवतमाळ विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानानेच मतदान करावे लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४YavatmalयवतमाळVotingमतदान