फेसबुक पोस्टने सावळी सदोबात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:50 IST2018-01-04T23:50:45+5:302018-01-04T23:50:58+5:30

आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथे फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गुरुवारी चांगलाच तनाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी चक्काजाम करून व्यापारपेठ बंद पाडली.

Facebook post stuttering tension | फेसबुक पोस्टने सावळी सदोबात तणाव

फेसबुक पोस्टने सावळी सदोबात तणाव

ठळक मुद्देटायर जाळून चक्काजाम : व्यापारपेठ बंद, युवकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
सावळी सदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथे फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गुरुवारी चांगलाच तनाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी चक्काजाम करून व्यापारपेठ बंद पाडली.
या प्रकरणी पारवा पोलिसांनी सुधाकर अर्जून वाघमारे (३२) रा.सावळी सदोबा याच्याविरुद्ध भादंवि २९५ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. फेसबूकवर देवी-देवतांचे अश्लील फोटो व वक्तव्य असल्याची पोस्ट उघड झाली. त्यामुळे सावळीमध्ये तनावाची स्थिती उद्भवली. नागरिक व युवक मंडळी एकत्र आल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. मुख्य चौकात टायर जाळून रोष व्यक्त करीत वाहतूक बंद पाडण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पारवाचे ठाणेदार अनिल राऊत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. संशयित सुधाकरविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांच्या आवाहनामुळे सायंकाळी बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Facebook post stuttering tension