शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

पावसाळा तोंडावर, तरीही रस्त्यांवरील खड्डे कायम

By admin | Updated: May 25, 2017 01:17 IST

पावसाळा आठवडाभरावर येऊन ठेपला. परंतु अद्यापही रस्त्यांवरील खड्डे (पॅचेस) बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

उरला केवळ आठवडा : द्वि-वार्षिक देखभाल योजनेचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा आठवडाभरावर येऊन ठेपला. परंतु अद्यापही रस्त्यांवरील खड्डे (पॅचेस) बुजविण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. द्वि-वार्षिक देखभाल योजनेच्या नव्या पॅटर्नमुळे दुरुस्तीच्या कामांना तत्काळ सुरुवात होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात खड्ड्यांचा सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात दरवर्षी योजनेत्तर अनुदानातून (लेखाशिर्ष ३०-५४) स्थानिक पातळीवर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे काढली जात होती. यातून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात होते. ३१ मेनंतर कोणत्याही परिस्थितीत डांबरी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेशच आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी राज्यभरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात होते. यावर्षीही या कामांच्या निविदा सर्वत्र काढल्या गेल्या. परंतु ऐनवेळी शासनाच्या नव्या पॅटर्नची एन्ट्री झाल्याने या निविदांना ब्रेक लावावा लागला. थेट फौजदारीची तंबीजुन्या पद्धतीने खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केल्यास थेट फौजदारी कारवाई करू, अशी तंबी शासनाने दिल्याने कुणीही बांधकाम अभियंते रस्त्यांच्या दुरुस्तीच्या भानगडीत पडण्यास तयार नाही. परंतु त्याचा सामनासुद्धा पावसाळ्यात या अभियंत्यांनाच करावा लागण्याची चिन्हे आहे. कारण सध्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. पावसाळ्यात त्यांची खोली व संख्या आणखी वाढणार असल्याने अपघाताच्या घटना बळावणार आहेत. त्यामुळे रस्ता कामांच्या दर्जावर, अभियंत्यांच्या क्षमतेवर व प्रामाणिकपणावर लोकप्रतिनिधी, जनतेतून प्रश्नचिन्ह लावले जाईल. याच मुद्यावर विधीमंडळ अधिवेशन गाजल्यास चार-दोन अभियंत्यांवर निलंबन कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ३१ मार्चचे कंत्राट रद्दशासनाने आता द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्ती योजना आणली आहे. या योजनेत एकाच कंत्राटदाराला अनेक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट दोन वर्षांसाठी देण्याचे नियोजन आहे. या योजनेमुळे जुने ३१ मार्चचे कंत्राट शासनाच्या आदेशाने रद्द केले गेले. परंतु नवी योजना अद्यापही कार्यान्वित झाली नाही. वास्तविक देखभाल दुरुस्तीची जुनी पद्धत बंद करताना नवी पद्धत अगदी तयार असायला हवी होती. परंतु तसे न झाल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविणार कोण ? याचा पेच बांधकाम खात्यात निर्माण झाला आहे.जीआर काढणारेच संभ्रमातनव्या द्वि-वार्षिक योजनेचा शासन आदेश १२ एप्रिल रोजी जारी करण्यात आला असला तरी तो काढणाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. हा आदेश काढल्यानंतर आता त्यावर क्षेत्रीय स्तरावरून सूचना, आक्षेप मागविले गेले आहे. त्यामुळे दुरुस्तींच्या कामाचा अद्याप पत्ता नाही. या नव्या योजनेत आता निविदा काढल्यातरी किमान एक महिना त्या प्रक्रियेसाठी लागणार आहे. इकडे ३१ मे नंतर डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवू नये, असे शासनाचेच आदेश आहे. त्यामुळे बांधकाम खात्यात सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे.