विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: June 7, 2015 00:06 IST2015-06-07T00:06:21+5:302015-06-07T00:06:21+5:30

प्राथमिक शाळेला खाते मान्यता मंजुरीसाठी २३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण विस्तार अधिकारी आणि एका ...

The extension officer is in the trap of ACB | विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

२३ हजाराची लाच : यवतमाळ पंचायत समितीसमोर कारवाई
यवतमाळ : प्राथमिक शाळेला खाते मान्यता मंजुरीसाठी २३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण विस्तार अधिकारी आणि एका शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई यवतमाळ पंचायत समिती समोर शनिवारी करण्यात आली.
सुरेश गुलाबराव निकम असे लाचेची मागणी करणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याचे आणि राजू ओंकार गोरे असे शिक्षकाचे नाव आहे.
पुसद तालुक्यातील बान्सी भवानी नगर येथील मनोहरराव नाईक प्राथमिक शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांकडून खाते मान्यता मंजूर करून देण्यासाठी २३ हजार रुपयांची लाच या दोघांनी मागितली होती. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून शनिवारी येथील गोदनी मार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारकर्त्याकडून २३ हजार रुपये स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश निकम आणि शिक्षक राजू गोरे याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईची माहिती होताच अनेकांचे धाबे दणाणले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, नीलेश पखाले, गजानन राठोड आदींनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The extension officer is in the trap of ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.