जिल्ह्यातील घाटावर अवैध रेती उत्खनन
By Admin | Updated: July 6, 2016 02:46 IST2016-07-06T02:46:28+5:302016-07-06T02:46:28+5:30
जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटावर मोठ्याप्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून पावसाळ्यामुळे अनेक जण रेतीचे अवैध साठे करीत आहे.

जिल्ह्यातील घाटावर अवैध रेती उत्खनन
यवतमाळ : जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटावर मोठ्याप्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून पावसाळ्यामुळे अनेक जण रेतीचे अवैध साठे करीत आहे. असाच प्रकार बाभूळगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. बाभूळगाव तालुक्यातील मिटनापूर येथील सै.जलील सै.खलील याने आपल्या मालकीच्या जागेत दहा ब्रास रेतीची अवैध साठवणूक केल्याचे उघडकीस आले. या रेतीची किंमत ३० हजार रुपये आहे. हा प्रकार लक्षात येताच बाभूळगाव तहसील कार्यालयात तलाठी राजेंद्र जगताप यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा करीत आहे. पावसाळ्यात नदी पात्रात पाणी असल्याने रेती उत्खनन करणे कठीण जाते. त्यामुळे अनेक जण रेतीचा साठा करीत आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाने रेतीसाठा करण्यावर निर्बंध घातले असून असा प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्यावर थेट पोलीस कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतरही जिल्ह्यात ठिकठिकाणी रेतीची साठवणूक होत आहे.