शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

‘एक्झिट पोल’ने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:29 PM

चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली हे तीन लोकसभा मतदारसंघ जिल्ह्याशी संबंधित आहे. या तिन्ही मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा प्रचारात व मतदानानंतरसुद्धा काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. सर्वत्र मोदीविरोधी वातावरण आहे व त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगितले जात होते.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, हिंगोली मतदारसंघात युतीत उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली हे तीन लोकसभा मतदारसंघ जिल्ह्याशी संबंधित आहे. या तिन्ही मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा प्रचारात व मतदानानंतरसुद्धा काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. सर्वत्र मोदीविरोधी वातावरण आहे व त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे सांगितले जात होते. शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा अखेरचा टप्पा संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी सायंकाळी आपले ‘एक्झिट पोल’ अर्थात मतदानोत्तर अंदाज वर्तविले. त्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाच्या नेतृत्वात मुसंडी मारेल, असे दाखविले गेले. महाराष्ट्रात युतीला ३८ ते ४० जागा दाखविल्या जात आहे. शिवसेनेला २० ते २२ जागा सांगितल्या गेल्या आहे. तर काही वाहिन्यांनी काँग्रेसला केवळ ० ते १ जागा एवढी वाईट परिस्थिती दाखविली आहे. काही वाहिन्या काँग्रेस व राष्ट्रवादीला चार ते आठ जागा मिळतील, असे सांगितले आहे.यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली या तिन्ही जागा भाजप-शिवसेना युतीला दाखविल्या जात आहे. ‘एक्झिट पोल’चे हे अंदाज पाहून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्याचवेळी या ‘एक्झिट पोल’वर काँग्रेसचे कार्यकर्ते तोंडसुखही घेताना दिसत आहे. २३ मेनंतर ईव्हीएम घोटाळ्याची ओरड होऊ नये म्हणून आताच भाजपला फायदेशीर ठरतील, असे ‘एक्झिट पोल’ दाखविले जात असल्याचा सूरही काँग्रेस कार्यकर्ते आळवत आहे.या ‘एक्झिट पोल’मुळे भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे. २३ मे रोजी केव्हा एकदाची मतमोजणी होते आणि विजयाचा जल्लोष साजरा करतो, असे या कार्यकर्त्यांना झाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही चर्चेतून आढावा घेताना दिसत आहेत. त्याचवेळी २३ मेनंतर प्रतक्षात वेगळेच चित्र पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मोदींनी देशाचे वाटोळे केले, मोदींविरोधात नोटबंदी, जीएसटीमुळे प्रचंड लाट आहे, काँग्रेसला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे आगामी सरकार हे काँग्रेसचेच असेल, असा दावा करणाऱ्या काँग्रेसचा रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल’ने पुरता भ्रमनिरास केला आहे. यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित लोकसभेच्या तिन्ही जागा भाजप-सेना युतीला दाखविल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता तर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.विविध वाहिन्यांचे जाहीर झालेले ‘एक्झिट पोल’ २३ मे रोजी ‘उघडे’ पडतील व जनतेचा खरा कौल कळेल. या पोलवर कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्याबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात आहे. पोल सांगते तसा निकाल निश्चितच लागणार नाही. काँग्रेसचा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ चार जागा दाखविल्या जात आहे. हे शक्यच नाही. यवतमाळ-वाशिमच्या जागेवरही काँग्रेसच विजयी होईल.- माणिकराव ठाकरेमाजी प्रदेशाध्यक्ष तथा काँग्रेसचे उमेदवार, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघजाहीर झालेले ‘एक्झिट पोल’ आम्हाला मान्य नाही. ते किती बोगस आहे हे २३ मे रोजी स्पष्ट होईलच. काँग्रेसच सत्तेवर येईल व पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. आजही भाजप सरकारविरोधात जनतेत नाराजी आहे. जिल्ह्याची जुळलेल्या लोकसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील.- आमदार डॉ.वजाहत मिर्झाअध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ‘एक्झिट पोल’ जो अंदाज वर्तवित आहे, प्रत्यक्षात तसे निकाल येणार नाहीत. भाजपविरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीला निश्चित मिळेल. जिल्ह्याशी संबंधित लोकसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल.- आमदार ख्वाजा बेगअध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ