शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:01 PM

वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

ठळक मुद्देगळीत हंगामावर प्रश्नचिन्ह : ३० महिन्यांपासून वेतनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून इतर कारखान्यांच्या चिमणीतून धूर निघत असताना वसंतच्या गळीत हंगामावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या या कारखान्यातील कामगारांना गत ३० महिन्यांपासून वेतन नाही. भाजपाने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर परिस्थितीत तसूभर सुधारणा झाली नाही.पुसद, उमरखेड, महागाव यासह मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना कामधेनू आहे. १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने हा कारखाना सुरू झाला. २०१५ पर्यंत या कारखान्याने सलग गाळप केले. त्यामुळे परिसरात समृद्धी आली. ऊस उत्पादक कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. गत काही वर्षापासून कारखान्याला उतरती कळा लागली. कामगारांचे देणे थकीत होत गेले. गत ३० महिन्यांपासून कामगारांच्या वेतनाचे आठ कोटी ६३ लाख रुपये थकीत आहे. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही.या कारखान्याची अवस्था बघता निवडणूक अविरोध करून माजी आमदार माधवराव पाटील यांना अध्यक्ष तर कृष्णा देवसरकर यांना उपाध्यक्ष करण्यात आले. त्यांनी गतवर्षी कसाबसा गाळप हंगाम सुरू केला. परंतु कारखान्याच्या इतिहासातील निच्चांकी गाळप गतवर्षी करण्यात आले. कामगारांनी वेतनासाठी आंदोलन केले. त्याचदरम्यान ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्यात आले. परंतु कारखान्याची आर्थिकस्थिती सुधारली नाही. दरम्यान वसंतच्या अध्यक्षपदाचा माधवराव पाटलांनी राजीनामा दिला.भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्ष झाले. भाजपची सत्ता असल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अद्यापही गळीत हंगाम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. शासनानेही कोणतीही मदत केली नाही. परिणामी कारखाना बंद आहे. कारखान्याला कायमचे टाळे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.दिवाळीही गेली अंधारातवसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना ३० महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऊस उत्पादकांनाही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कामगारांसोबतच या भागातील शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. कारखाना कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.