एक्साईज एसपींची झाडाझडती

By Admin | Updated: July 7, 2015 01:53 IST2015-07-07T01:53:46+5:302015-07-07T01:53:46+5:30

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सोमवारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांची ‘तुमची कामगिरी काय’ असा जाब विचारत झाडाझडती घेतली.

Exhaust sparks | एक्साईज एसपींची झाडाझडती

एक्साईज एसपींची झाडाझडती

यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सोमवारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांची ‘तुमची कामगिरी काय’ असा जाब विचारत झाडाझडती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी गाजते आहे. त्यासाठी गावागावात गावठी दारू विरोधात आंदोलने उभी राहत आहेत. त्यातच यावली (ईजारा) येथील दारू विक्रीला विरोध करणाऱ्या पोलीस पाटलाचा खून झाला. त्यामुळे जिल्हा दारूबंदी आणि अवैध दारूच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेले राज्य उत्पादन शुल्क विभाग चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक्साईज एसपींना दुपारी पाचारण केले. मी आल्यापासून तुमची कामगिरी काय, किती धाडी घातल्या, किती दारू पकडली, किती मोठ्या कामगिरी केल्या, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. याच मुद्यावर त्यांची झाडाझडती घेत ‘परफॉर्मन्स दाखवा अन्यथा खैर नाही’ अशा शब्दात तंबी दिली. (नगर प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुसद तालुक्यातील एका धरणाच्या अभियंत्याला दुपारी फोन लावला. तुम्ही कुठे आहात, अशी विचारणा केली, त्यावर या अभियंत्याने मी धरणाच्या साईटवर आहे, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना हा अभियंता घरी असल्याचा संशय आला. म्हणून त्यांनी या अभियंत्याला तुम्ही धरणावर असल्याबाबतचे छायाचित्र दोन मिनिटात माझ्या व्हॉटस्अपवर टाका, असे निर्देश दिले. यामुळे अभियंता गोंधळून गेला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ रिलीफ मिळत असल्याने अलिकडे एसपीऐवजी कलेक्टरकडे तक्रार घेऊन जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. बाभूळगाव ठाणेदाराला नुकताच याचा परिचय आला.

Web Title: Exhaust sparks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.