दगडधानोराच्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न

By Admin | Updated: May 8, 2016 01:59 IST2016-05-08T01:59:15+5:302016-05-08T01:59:15+5:30

दगडधानोरा येथील विकास पंडित जोगदंडे याचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

The execution of the murderer of the policemen | दगडधानोराच्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न

दगडधानोराच्या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न

मुळावा : दगडधानोरा येथील विकास पंडित जोगदंडे याचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रकरणी रवी दत्ता जोगदंडे याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
विकास जोगदंडे यांचा मृतदेह ५ मे रोजी दगडधानोरा शिवारात आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण अवजाराचे वार होते. या बाबीची तक्रार अनिल भारत जोगदंडे यांनी पोफाळी पोलिसात दिली.
विकास जोगदंडे व रवी दत्ता जोगदंडे हे दोघेही शेळ््या चारण्यासाठी गेले होते. विकास बेशुद्ध पडून असल्याचा फोन रवी जोगदंडे
याने विकासच्या नातेवाईकांना केला होता.
मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तपास सुरू करण्यात आला. मित्र रवीनेच विकासचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. मित्रानेच मित्राचा खून केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. मात्र या खुनामागील कारण स्पष्ट झाले नाही. (वार्ताहर)

Web Title: The execution of the murderer of the policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.