शनिशिंगणापुरातील घटना धर्मक्रांती

By Admin | Updated: December 6, 2015 02:33 IST2015-12-06T02:33:49+5:302015-12-06T02:33:49+5:30

शनिशिंगणापुरातील रुढी- परंपरेचा फटका माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींनाही सहन करावा लागला होता.

Events in Shanishingan | शनिशिंगणापुरातील घटना धर्मक्रांती

शनिशिंगणापुरातील घटना धर्मक्रांती

जिजाऊ ब्रिगेड : ‘त्या’ युवतीची कृती कौतुकास्पद
यवतमाळ : शनिशिंगणापुरातील रुढी- परंपरेचा फटका माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींनाही सहन करावा लागला होता. त्यांना दर्शनाशिवाय परतावे लागले होते. मात्र एका युवतीने चौथऱ्यावर चढून शनी देवाला तेलाचा अभिषेक केला. ही घटना धर्मक्रांती करणारी आहे, असे जिजाऊ ब्रिगेडने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
परंपरा तोडली म्हणून गावातील युवकांनी युवतीचा निषेध नोंदविला. इतकेच नव्हेतर, शनिदेवतेची मूर्ती दुग्धाभिषेक करून पवित्र करण्यात आले. ही घटना स्त्रीला अस्पृश्य ठरविणारी आहे. एकेवीसाव्या शतकातही हा भेदभाव पाळला जातो. या घटनेचा निषेध जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने नोंदविण्यात आला. महिलांचा अपमान करणाऱ्या मंदिरांकडे त्यांनी पाठ फिरवावी, असे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. छाया दिलीप महाले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राचार्य संगीता घुईखेडकर, राजश्री कुरटकर, प्रा.सुवर्णा ठाकरे, संगीता कुणाडे, आशा काळे, विद्या खडसे, प्रा.डॉ.सुधा खडके, अर्चना देशमुख, सुजाता गुजर, मंजरी चव्हाण यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Events in Shanishingan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.