शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय टँकरची गर्दी तरीही वाघापूर तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:02 IST

वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात.

ठळक मुद्देमजूर वर्गाला पाणी मिळेनास्मशानभूमीतील हातपंप चोरीला‘एअर लिक’वरून महिला भरतात पाणीएकाच वेळी सर्वांचे टँकरनियोजनाअभावी जनसामान्यांचे हाल

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात. त्यांच्या मनात प्रशासनाविषयी रोष आहे.यवतमाळ शहरातील राजकीय उलथापालथीचे केंद्रस्थान म्हणून वाघापूरकडे पाहिले जाते. सर्वच पक्षातील ‘अ‍ॅक्टीव’ कार्यकर्ते या भागात आहे. यामुळे सर्वाधिक टँकर या भागाकडे वळते झाले. तरी पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. सोबतच नियोजनचा अभाव आहे. यामुळे झोपडपट्टी वसाहतीत पाणीच पोहचले नाही. यातून दररोज पाण्यासाठी संघर्षाची ठिणगी पडते.वाघापुरातील स्मशानभूमीचा परिसर पाण्याच्या मुबलकतेने परिपूर्ण आहे. या ठिकाणच्या तीन हापशांना मुबलक पाणी आहे. स्मशानाच्या आत दोन तर प्रवेशद्वारावर एक हातपंप आहे. आतील दोन हातपंपांना मुबलक पाणी आहे. यातील एका हातपंपावरील ‘मटघर’ रात्रीतून चोरीला गेले. तेव्हापासून या भागात पाण्याची मोठी मारामार सुरू झाली. एकाही लोकप्रतिनिधीने त्या हातपंपावर ‘मटघर’ बसविले नाही. याचे शल्य या भागातील नागरिकांना आहे. यामुळे पवन कोळकर, राजू गाढवकर, योगेश राठोड यांनी ही हापशी तत्काळ दुरूस्त करावी, अशी कळकळीची विनंती केली. हापशी दुरूस्त झाली तर मग टँकर येवो अथवा न येवो आम्हाला कुठलीही खंत वाटणार नाही, असे ते म्हणाले. पण कोणीही हापशी दुरुस्त केली नाही. दिवसभर काम करावे का पाणी भरावे, हाच आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. पाण्याशिवाय घर चालत नाही. यामुळे काम आटपून आल्यानंतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, असे मारूती उईके म्हणाले.अनिल पुरी शिवाजीनगरात वास्तव्याला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला फेबु्रवारीपासून पाण्यासाठी चटके सहन करावे लागत आहे. नगरपरिषदेचे टँकर त्यांच्या भागाकडे फिरकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजपर्यंत पाण्यासाठी असे कधीच हाल झाले नाही. खºया अर्थाने रात्रन्दिवस काम करावे लागत आहे. यामुळे नगरातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे, असे शरद वाघ म्हणाले. १४ एप्रिलला नळ आले. त्यात दोन गुंड पाणी मिळाले. यानंतर पाण्याचा एक थेंबही आला नाही. या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र पाणी येत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.या भागातील गृहिणींनी पाण्यासाठी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. पिण्यासाठी पाण्याचे बॅरल आणू शकत नाही. यामुळे प्राधिकरणाच्या ‘लिक वॉल्व्ह’वरून पाणी भरले जाते. त्यासाठी तासन्तास स्मशानात रात्र जागून काढावी लागते. नगरपरिषद, भाजपा, शिसेना आणि अपक्षाचे टँकर आहेत. इतके टँकर असतानाही गरिबांच्या झोपडीपर्यंत टँकर पोहचतच नाही. टँकरचा वेळ आणि कामाला जाणाºया मजुरांचा वेळ वेगवेगळा आहे. मजूर सकाळीच कामाला जातात. टँकर दुपारी येतो. जे लोक घरी असतात ते पाणी भरतात. मजुरांना पाणीच मिळत नाही, असे ममता भगत आणि मनिषा भगत म्हणाल्या. पाणी वाटपासाठी असणाºया टँकरचे नियोजन नाही. एकाच वेळी सगळे टँकर एकाच लाईनला जातात. नंतर आठ दहा दिवस दिसत नाही. यासाठी सर्वांनी मिळून वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी महिलांनी केली.सकाळी वाटप का नाही?ज्या नागरिकांना पाण्याची गरज आहे, असे लोक घरी नसताना टँकर येतो. हे टँकर कधी येतात याची माहिती नागरिकांना नसते. त्याचे ठराविक वेळापत्रक नाही. यासाठी सकाळी अथवा सायंकाळी पाणी वितरित का केले जात नाही, असा प्रश्न वाघापुरातील नागरिकांनी उपस्थित केला.