गावकऱ्यांच्या परवानगीनंतरच बाहेरच्यांना एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ...

Entry to outsiders only after villagers' permission | गावकऱ्यांच्या परवानगीनंतरच बाहेरच्यांना एन्ट्री

गावकऱ्यांच्या परवानगीनंतरच बाहेरच्यांना एन्ट्री

Next
ठळक मुद्देरोहटेक, जामडोह नागरिकांनी केली नाकाबंदी : कोरोनाच्या भीतीने गावाच्या हिताचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ग्रामस्थांनी गावबंदी घातली आहे. यातून गाव सुरक्षित रहावे हा नागरिकांचा मूळ उद्देश आहे.
पुणे-मुंबईत रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे लोंढे गावखेड्याकडे वळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या बसफेऱ्या रोखल्या आहे. असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती खासगी वाहनाच्या मदतीने गावखेड्यात प्रवेश करीत आहे. दररोज बाहेर जिल्ह्यातील नागरिकांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहे.
विदेशातून आलेल्या व्यक्ती आणि पुणे-मुंबईतील व्यक्ती यांच्यामुळेच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा समज गावकऱ्यांचा झाला आहे. याशिवाय इतर कुठला व्यक्ती कोरोनाचा विषाणू बाधित झाला असेल हे कुणालाही सांगत येत नाही. कोरोनाची बाधा झालेला व्यक्ती १४ दिवसानंतरच लक्षणे दाखवितो. तोपर्यंत अनेकांना त्याची बाधा होते. हा प्रकार थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी डोर्ली गावात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. बुधवारी रोहटेक आणि जामडोह गावामध्ये नागरिकांनी अशाच प्रकारे बाहेर ठिकाणावरुन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. कोरोनाची बाधा रोखण्यासाठी हा निर्णय या गावातील व्यक्तींनी घेतला आहे. जामडोहमध्ये मुख्य रस्त्यावर दोर बांधून बाहेर ठिकाणावरून येणारी वाहने थांबविण्यात येत आहे. तर रोहटेकमध्ये नागरिकांनी रस्त्यांवर दगडांचा थर लावून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. रस्त्यावर तशा स्वरूपाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. यामुळे गावाबाहेर पडलेल्या आणि परजिल्ह्यात वास्तव्याला असणाºया व्यक्तींना आता या गावांमध्ये प्रवेश करताना गावकºयांची खात्री झाल्यानंतरच गावात प्रवेश मिळणार आहे.

Web Title: Entry to outsiders only after villagers' permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.