अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्येही गुणवत्ता घसरत असताना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे.इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने १६ मे रोजी बैठक घेतली. बैठकीत मुख्याध्यापकांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार आता २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून शासकीय आश्रमशाळेतील सहावी ते आठवीसाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे. तर पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी पूर्वतयारी सुरू करावी, असे आदेश शुक्रवारी प्रकल्प कार्यालयाने दिले आहेत.खेड्यापाड्यातील मागासवर्गीयांची आणि गोरगरिबांची मुले आश्रमशाळांमध्ये शिकत आहे. मात्र दर्जेदार शिक्षणाअभावी ही मुले दहावीनंतर स्पर्धेत मागे पडतात. त्यामुळे पहिला वर्गापासूनच त्यांना इंग्रजी माध्यमात शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करणारे पांढरकवडा प्रकल्प कार्यालय राज्यात पहिलेच ठरले आहे. या निर्णयामुळे शासकीय आश्रमशाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे. मात्र इंग्रजी आणि सेमी इंग्रजी सुरू करताना शिक्षकांनाही त्या दृष्टीने अद्ययावत प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.नऊ शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्गराळेगाव तालुक्यातील अंतरगाव, मारेगावमधील बोटोणी, कळंबमधील नांझा, यवतमाळ तालुक्यातील चिचघाट, कापरा, हिवरी, घाटंजी तालुक्यातील जांब, झटाळा आणि झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय आश्रमशाळेत सहावी ते आठवीचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे. एकीकडे जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा विविध समस्यांमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे प्रकल्प कार्यालयाने या ठिकाणी चक्क इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेऊन पालक वर्गालाही सुखद धक्का दिला आहे.चार ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमराळेगाव तालुक्यातील अंतरगाव, झरी तालुक्यातील शिबला, कळंब तालुक्यातील नांझा आणि घाटंजी तालुक्यातील जांबच्या शासकीय आश्रमशाळेत पहिली ते पाचव्या वर्गासाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले जाणार आहे. २०१९-२० या सत्रापासून पहिला वर्ग सेमी इंग्रजीचा राहणार आहे.
आश्रमशाळांमध्ये सुरू होणार इंग्रजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:19 IST
जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्येही गुणवत्ता घसरत असताना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे.
आश्रमशाळांमध्ये सुरू होणार इंग्रजी
ठळक मुद्देसंडे अँकर । पांढरकवडा प्रकल्प कार्यालय, यवतमाळ, घाटंजी, कळंबमधील १३ शाळा