‘जेडीआयईटी’त अभियांत्रिकी ‘एआरसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2015 02:08 IST2015-06-04T02:08:08+5:302015-06-04T02:08:08+5:30
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सत्र २०१५-१६ च्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ५ जूनपासून सुरुवात होत आहे.

‘जेडीआयईटी’त अभियांत्रिकी ‘एआरसी’
यवतमाळ : प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सत्र २०१५-१६ च्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ५ जूनपासून सुरुवात होत आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज स्वीकृती केंद्रावर (एआरसी) नोंदणी करून आवश्यक दाखल्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे ही नोंदणी प्रक्रिया नि:शुल्क राबविली जाणार आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठीची प्रवेश प्रक्रिया सामाईक केंद्रीभूत आॅनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. ‘जेडीआयईटी’ हे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मान्यता प्राप्त अर्ज स्वीकृती केंद्र (एआरसी) आहे. तसेच महाविद्यालयात प्रवेश मार्गदर्शन केंद्र उघडले आहे, याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केली आहे. (वार्ताहर)