शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कलासक्त मनांना प्रेरणास्थळावर मिळाली नवनिर्मितीची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प पार पडला. देशातील सुप्रसिद्ध कलावंत यात सहभागी झाले.

ठळक मुद्देबाबूजींना प्रतिभावंतांचे नमन । देश-विदेशात विख्यात चित्रकारांची दर्डा उद्यानात भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध क्षेत्रात स्वत:ची अमिट छाप सोडून गेलेल्या बाबूजींचा देशातील अनेक कलावंतांवरही प्रभाव आहे. त्याच ओढीतून देश-विदेशात विख्यात असलेल्या चित्रकारांनी प्रेरणास्थळावर येऊन बाबूजींच्या समाधीला नमन केले. येथील निसर्गरम्य वातावरणाने आणि बाबूजींच्या पावन स्मृतींनी नवी उर्जा मिळाल्याची तृप्त भावना या कलावंतांनी व्यक्त केली.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प पार पडला. देशातील सुप्रसिद्ध कलावंत यात सहभागी झाले. शनिवारी सकाळी या कलावंतांनी यवतमाळात धाव घेत बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळाला भेट दिली. त्यानंतर मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळीही भेट दिली.या कलावंतांमध्ये विनोद शर्मा, शोभा ब्रुटा, काहिनी अर्ते मर्चंट, सूर्यकांत लोखंडे, आनंद पांचाळ, मनिष पुष्कळे, संजय सोनपिंपरे, विजेंद्र सिंह, एम. नारायण, दीपक शिंदे, स्विटा राय, तेजींदर कांडा, वाहिदा अहमद, प्राजक्ता पालव, सुहास बाहुलकर, साधना बाहुलकर आदींचा समावेश होता. त्यांचे आगमन होताच लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, लव दर्डा, सोनाली दर्डा, विलास देशपांडे, सुभाष यादव उपस्थित होते.प्रेरणास्थळ ‘रिअली इन्स्पायरिंग’बाबूजींच्या समाधीपुढे नतमस्तक होतानाच नामवंत चित्रकारांनी प्रेरणास्थळावरील वनराई, हिरवाई आदींची नवलाई मनात भरून घेतली. तेथील निवांतपणा मनात साठवून घेतला. ‘इस नैसर्गिक क्षेत्र में आकर अत्यंत सुखद अनुभूती हुई’, ‘व्हिजिटींग टू प्रेरणास्थळ इज रिअली इन्स्पायरिंग’ असा शेरा लिहून हे कलावंत रवाना झाले. अन् जाताना यवतमाळला पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छाही घेऊन गेले!स्थानिक कलावंतांनी घेतली धावदेशभरात ख्याती मिळविलेले प्रतिभावंत चित्रकार प्रेरणास्थळावर येत असल्याचे कळताच यवतमाळातील स्थानिक कलावंतांनीही त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. अरुण लोणारकर, संजय सांबजवार, प्रदीप गज्जलवार, भूषण मानेकर, महेश ठाकरे, राजश्री कुलकर्णी, आदिती भिष्म, अभिजित भिष्म, रंजित वनकर या स्थानिक कलावंतांनी इतर राज्यातून, इतर शहरातून आलेल्या नामवंतांशी चर्चा करून चित्रकारितेतील विविध बारकावे जाणून घेतले. कलासक्त मनांनी अनुभवांचे, कल्पनांचे देवाण-घेवाण केली. कलाकारांची-कलाकारांनी घेतलेली ही मुलाखत अनेकांसाठी चिरस्मरणीय ठरली.

टॅग्स :Prerna Sthalप्रेरणास्थळYavatmalयवतमाळ