ऊर्जामंत्री साधणार ग्राहकांशी संवाद

By Admin | Updated: April 16, 2017 01:06 IST2017-04-16T01:06:57+5:302017-04-16T01:06:57+5:30

राज्याचे ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २४ एप्रिल रोजी येथे वीज ग्राहकांशी संवाद साधणार आहेत.

Energy Consumers Communicate with Customers | ऊर्जामंत्री साधणार ग्राहकांशी संवाद

ऊर्जामंत्री साधणार ग्राहकांशी संवाद

यवतमाळ : राज्याचे ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २४ एप्रिल रोजी येथे वीज ग्राहकांशी संवाद साधणार आहेत. विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयात दुपारी १२ ते २ या वेळात ते नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदनाचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. सोबतच त्यांच्या हस्ते जिल्ह्यात विविध कामांचे उद्घाटन, भूमिपूजन होणार आहे. विद्युत कंपनीशी संबंधित तक्रारीची प्रत २१ एप्रिलपर्यंत स्वीकारली जाणार आहे. शिवाय उपकार्यकारी अभियंता एस.जे. कविटकर यांच्याकडेही तक्रार सादर करता येईल. (वार्ताहर)

Web Title: Energy Consumers Communicate with Customers