नाल्यातील डोहात बुडून माय-लेकाचा अंत

By Admin | Updated: October 6, 2014 23:19 IST2014-10-06T23:19:11+5:302014-10-06T23:19:11+5:30

डोहातील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणारी ही घटना पुसद

The end of the Mi-Leka drowning in the drain | नाल्यातील डोहात बुडून माय-लेकाचा अंत

नाल्यातील डोहात बुडून माय-लेकाचा अंत

सेवादासनगरची घटना : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी अंत
पुसद : डोहातील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणारी ही घटना पुसद तालुक्यातील सेवादासनगर येथे घडली. विशेष म्हणजे सदर महिला ही पाहुणपणाला माहेरी आली होती.
रंजना नामदेव जाधव (३२) आणि महेश नामदेव जाधव (१०) रा. लाखखिंड ता. दारव्हा अशी मृत माय-लेकांची नावे आहे. रंजना आपल्या महेश या मुलासोबत पाहुणपणासाठी माहेरी आली होती. शनिवारी दुपारी ती आपली आई शकुंतला राठोड, मुलगा महेश सोबत गावाजवळ असलेल्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेली. कपडे धुत असताना महेश नाल्याच्या तीरावर खेळत होता. अचानक महेश पाण्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी रंजनाने डोहात उडी घेतली. मात्र तिलाही पोहणे येत नसल्याने तीही गटांगळ्या खाऊ लागली. हा प्रकार आई शकुंतलाला दिसताच तिने जीवाच्या आकांताने डोहात उडी घेतली. मुलीला आणि नातवाला वाचविण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत घटना गावात माहीत झाली. गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. शकुंतलाने डोहातून रंजना व महेशला तोपर्यंत बाहेर काढले होते. गावकऱ्यांनी तत्काळ पुसद येथील रुग्णालयाकडे या दोघांना घेऊन धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी रंजना व महेशला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती होताच लाखखिंड येथील तिच्या पतीसह नातेवाईकांनी धाव घेतली. या प्रकरणी रवींद्र चरण राठोड यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The end of the Mi-Leka drowning in the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.