शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

जीएस कर्ज घोटाळा अखेर सीबीआयकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:12 PM

येथील जीएस आॅईल या कंपनीने अज्ञात शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, कंपनीच्या संचालकाने पाच वर्षापूर्वी कंपनी बंद करून येऊन पोबारा केला.

ठळक मुद्देपथक धडकले : शेतकऱ्यांच्या नावे करोडोची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील जीएस आॅईल या कंपनीने अज्ञात शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची उचल केल्याचे प्रकरण उघडकीस आले.दरम्यान, कंपनीच्या संचालकाने पाच वर्षापूर्वी कंपनी बंद करून येऊन पोबारा केला. हे प्रकरण आता ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले असून सीबीआयचे अधिकारी मंगळवारी रात्री घोन्सा येथे येऊन गेले. मात्र त्यांना त्या शेतकºयांचा थांगपत्ता लागला नाही.१० वर्षापूर्वी वणी-भालर रोडलगत जीएस आॅईल नावाची सोयाबीन तेल तयार करणारी फॅक्टरी उभी करण्यात आली. या फॅक्टरीत शेकडो बेरोजगारांना काम मिळाले. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळू लागला. परंतु हे सर्व औटघटकेचे ठरले. फॅक्टरीतून दोन ते तीन वर्षे तेलाचे उत्पादन झाले. मात्र त्यानंतर कंपनीच्या मालकाने कोट्यवधींचा घोटाळा करून पोबारा केला. अज्ञात शेतकºयांच्या नावावर खोटी कागदपत्र करून कर्जाची उचल करण्यात आली. कंपनीचे दिवाळे निघाल्याने अखेर एका बँकेने कंपनीला सील लावले. घोटाळ्यामध्ये कंपनीच्या संचालकाविरोधात फौजदारी गुन्हेही दाखल झाले होते. आता हा कर्ज घोटाळा सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. तालुक्यातील घोन्सा येथील २० व्यक्तींच्या नावावर प्रत्येकी ७० ते ८० लाख रूपयांच्या कर्जाची उचल करण्यात आल्याचे दिसून आले. ज्या व्यक्तीच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली, त्या व्यक्तीची व त्यांच्या संपत्तीची, कागदपत्रांच्या सत्यतेची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या नागपूर शाखेच्या पोलीस निरीक्षक कविता इसनकर ह्या आपल्या सहकाºयासह मंगळवारी रात्री घोन्सा येथे गेल्या. त्यांनी सरपंच व उपसरपंच यांना पत्र देऊन चौकशीतील व्यक्तीच्या संपत्तीविषयक व कागदपत्राविषयीची माहिती मागितली. यामध्ये घोन्सा येथील तानाजी चांदेकर, सुदर्शन बर्वे, बापूराव पोलसवार, लक्ष्मीकांत गड्डमवार, हरीदास उत्तरवार, रमेश रेड्डीवार, अरविंद बोबडे, अविनाश राठोड, नदीम, शिवा, राकेश गेडे, कैलास जिलपेल्लीवार, सुरेश कासावार, बाळू अंबरवार, प्रफुल्ल शेंडे, अनिल पंधरे, जोसेफ, राहुल येलपुलवार, माणिक कडू, कांताराव टिकले या शेतकºयांच्या नावे कर्जाची उचल केली आहे.मात्र यापैकी एकही व्यक्ती घोन्सा येथील रहिवासी नसल्याचे चौकशीत आढळून आले. बुधवारी भालर येथील विश्रामगृहात उपसरपंच व गावातील पोस्टमास्तरला चौकशीसाठी बोलाविण्यात आले. या सर्व २० व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून हिंगणघाट येथील एका बँकेतून कर्ज उचलण्यात आले आहे. या चौकशीबाबत पोलीस निरीक्षक कविता इसनकर यांना विचारले असता, आम्हाला माहिती देता येत नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आॅईल मील कंपनीतून भंगार लंपासभालर रोडवरील जीएस आॅईल कंपनीला सील केल्यानंतर चोरट्यांनी तेथील कोट्यवधी रुपये किंमतीचे भंगार लंपास करण्याचा सपाटा लावला. यंत्राद्वारे लोखंड कापून ते लंपास करण्यात आले. आता तेथे केवळ संरक्षण भिंत व ईमारतीचा ढाचा उभा आहे. दिवाळे निघालेल्या कंपनीने अनेकांचे दिवाळे काढून त्यांना कर्जबाजारी करून ठेवले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी