शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

वणी एमआयडीसीच्या जागेवर केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:00 AM

१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या.

ठळक मुद्देजागेबाबत संभ्रम : प्रशासनाकडून कारवाईची तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील भल्या मोठ्या मोकळ्या जागेवर गेल्या आठवडाभरापासून काही लोकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. अनेकांनी आपापली जागा हेरून त्यावर कुंपणही करून टाकले. आता या अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने तयारी चालविली आहे.१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले. काहींनी दगडाने खुणा करून आपली जागा निश्चित केली. तर काहींनी चक्क त्यावर टिनाच्या झोपड्या उभारल्या. यासंदर्भात कुणकुण लागताच, वणीचे तहसीलदार श्याम धनमने यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन पाहणी करण्यास सांगीतले. सोबत एक तलाठीही देण्यात आला. वनविभागाने या जागेची पाहणी केली असता, सदर जागा ही वनविभागाची नसल्याचे स्पष्ट झाले. सदर मोकळी जागा ही महाराष्ट्र औद्योगीक महामंडळाची असून त्याचा सातबाराही याच नावाने असल्याचे वणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांनी ह्यलोकमतह्णला सांगीतले. एमआयडीसी परिसरातील ही जागा अतिशय महत्वाची असून ही जागा बळकाविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी अतिक्रमणाचा मार्ग या लोकांनी स्विकारला आहे. ही जागा एमआयडीसीची असल्याने या जागेची काळजी वाहण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. त्यामुळे नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी या परिसरात ऑटोद्वारे ध्वनीक्षेपकावरून एमआयडीसीच्या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यास अतिक्रमणधारकांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.६८ वर्षांपूर्वी या जागेवर केली जायची वहितीसुमारे ६८ वर्षांपूर्वी गट क्रमांक १०६ मधील काही जमिनी सरकारने भूमिहीनांना दिल्या होत्या. मात्र संबंधितांनी काही वर्ष या जमिनीवर वहिती करून नंतर वहिती करणे बंद केले होते. परिणामी सरकारने या जमिनी ताब्यात घेतल्या. याविरूद्ध नऊ जमिनधारकांनी न्यायालयात प्रकरणही दाखल केले होते. एकूणच ही जागा आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण