Encroachment on the site of the temple at Vithala | विठाळा येथे देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण

विठाळा येथे देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण

दिग्रस : तालुक्यातील विठाळा येथे देवस्थानाच्या जागेवर अतिक्रमण करून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम त्वरित बंद करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी देवस्थान व्यवस्थापकांनी बीडीओंकडे केली आहे.

विठाळा येथे लाला महाराज देवस्थान आहे. देवस्थान व देवस्थानच्या मालमत्तेची देखरेख देवस्थानचे व्यवस्थापक साहेबराव माहुरे करतात. विलास तुळशीराम जाधव यांच्या वडिलाचे घर देवस्थानाला लागून आहे. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले. त्यांनी देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण करून घरकूल बांधकामासाठी खड्डे खोदून कॉलम उभे केले. देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याने शासनाच्या निधीचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप साहेबराव माहुरे यांनी निवेदनातून केला आहे.

देवस्थानच्या जागेवर सुरू बांधकाम तत्काळ रोखून अतिक्रमण हटविण्याची मागणी माहुरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या कामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, घरकुलाचे काम तातडीने बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावे, अशी मागणीही केली.

Web Title: Encroachment on the site of the temple at Vithala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.