पांढरकवडा येथे अतिक्रमण हटाव मोहीम
By Admin | Updated: May 31, 2015 02:20 IST2015-05-31T02:20:29+5:302015-05-31T02:20:29+5:30
येथील नगरपरिषदेतर्फे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी येथील अतिक्रमण हटविणे सुरू झाले.

पांढरकवडा येथे अतिक्रमण हटाव मोहीम
पांढरकवडा : येथील नगरपरिषदेतर्फे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी येथील अतिक्रमण हटविणे सुरू झाले.
शनिवारी शहरातील लोकमान्य टिळक वॉर्डातील स्टेडियम मार्गावरील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे बुलडोझरने पाडण्यात आली़ यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता़ सरकारी बगीच्याला लागून असलेल्या स्टेडियमच्या बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे. तेथील अतिक्रमणामुळे रस्त्याचे काम मागील बऱ्याच दिवसांपासून ठप्प पडले होते़ अनेकदा अतिक्रमण काढण्याबाबत नगरपरिषदेतर्फे संबंधितांना लेखी सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनी अतिक्रमण न हटविल्याने शनविारी अखेर अतिक्रमण हटविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अशोक गराटे यांनी दिली़
शहरातील अतिक्रमणधारक आता अत्यंत शिरजोर झाले आहे. शहरात कुठेही फुटपाथ शिल्लक राहिला नाही. अतिक्रमणामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अतिक्रमणाची ही वाळणवी सर्वांनाच नकोशी झाली आहे. मात्र नगपरिषद अतिक्रमण हटविण्यास का-कू करते. मात्र शनिवारी रस्त्यासाठी बाधक ठरलेले अतिक्रमण काढून नगरपरिषदेने अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. तहसील चौकातील अतिक्रमणही हटविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली़ (तालुका प्रतिनिधी)