अतिक्रमणाने वणीचे रस्ते झाले चिंचोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:36+5:30
व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाºया या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अतिक्रमणाने वणीचे रस्ते झाले चिंचोळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरातील खाती चौक ते तुटी कमान या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु व्यापाऱ्यांनी नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरच दुतर्फा दुकानातील साहित्य ठेवणे सुरू केल्याने या मार्गाने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाऱ्या या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरातील बहुतांश रस्ते अतिक्रमणाने व्यापले असून त्यामुळे रस्त्यावर वाहतूक प्रभावित होत आहे. चार महिन्यांपूर्वी खाती चौक ते तुटी कमान या ३४० मिटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण
खाती चौक ते तुटी कमान रस्त्यासाठी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले. ३४० मिटर लांबी, आठ मिटर रुंदीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे रस्ता तयार करताना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी व्यावसायिक प्रतिष्ठानापासून पुढे पाच फुट पेवर ब्लॉक तयार करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी व्यापारीच दुकानातील साहित्य ठेवत असलेल्या दुकानात येणारा ग्राहक आपले वाहन रस्त्यावरच उभे करतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पूर्वी वाहतूक नियंत्रणासाठी खाती चौकात वाहतूक शिपाई तैनात रहायचे. परंतु आता या ठिकाणी हे शिपायी कधीच दिसत नसल्याने वाहतूक अनियंत्रीत झाली आहे.
बाजारपेठेत ऑटोरिक्षा चालकांचा धुमाकूळ
वणीतील बाजारपेठेत अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यापाऱ्याकडून वर्दळीच्या रस्त्यावरच सांहत्य ठेवले जात असल्याने अगोदरच चिंचोळे असलेले रस्ते आणखी अरूंद झाले आहेत. त्यात बाजारपेठेत प्रवासी मिळविण्यासाठी ऑटोचालकांचा धुमाकूळ सुरू आहे. गर्दीतही हे ऑटोचालक अनियंत्रीतपणे ऑटो चालवित असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. कुणी हटकल्यास ह ऑटोचालक हटकणाऱ्याचाच पानउतारा करताना दिसतात.