ऊर्समुळे अनेकांना रोजगार

By Admin | Updated: February 10, 2016 03:10 IST2016-02-10T03:10:48+5:302016-02-10T03:10:48+5:30

बाबा कंबलपोष यांच्या उर्समुळे अनेकांना रोजगार मिळाला. आर्णीतील या यात्रेमध्ये जवळपास ७०० लहान-मोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे.

Employment for many because of Oars | ऊर्समुळे अनेकांना रोजगार

ऊर्समुळे अनेकांना रोजगार

बाबा कंबलपोष यात्रा : ७०० दुकानांची गर्दी
हरिओम बघेल आर्णी
बाबा कंबलपोष यांच्या उर्समुळे अनेकांना रोजगार मिळाला. आर्णीतील या यात्रेमध्ये जवळपास ७०० लहान-मोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे. या दुकानदारांनी यात्रा कमिटीकडे रितसर नोंद केली आहे. विशेष म्हणजे यात्रेव्यतिरिक्त शहरातील इतर दुकानदारांनाही यात्रेकरूंच्या गर्दीमुळे जादा फायदा होत आहे.
यात्रा परिसरात ७०० दुकानदारांनी कमिटीकडे नोंद करून विविध दुकाने थाटली आहे. यात पाळणा व इतर मनोरंजनाचीही साधने आहेत. या सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचा विचार केला तर यात्रा परिसरात तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्यासह शहरातील बिछायत केंद्र, किराणा दुकान, हॉटेल आदी व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणात आवक-जावक वाढली आहे.
बाबा कंबलपोष यात्रेसाठी बाहेरगावावरून मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येत आहेत. त्यामुळे आर्णीतील उलाढाल वाढली आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांना या गर्दीमुळे मोठा आधार मिळत आहे. वर्षभर संघर्ष करणाऱ्या दुकानदारांना यात्रेमुळे चांगल्या व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. सोबतच दर्गा परिसरात लंगर सुरू असल्यामुळे अनेकांच्या जेवणाचीही काळजी मिटली आहे. बाहेरगावातून आलेल्या व्यावसायिकांना लंगरमुळे जेवणाचा खर्च करण्याचीही गरज उरलेली नाही.
बाबा कंबलपोष यांच्या सामाजिक एकोप्यासोबतच यात्रेमुळे आर्णीच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भर पडल्याचे व्यावसायिकच सांगत आहे. बाबा कंबलपोष यांचाच हा आशीर्वाद असावा, असेही भाविकांमधून बोलले जात आहे.

बाबा कंबलपोष यात्रेमुळे अनेकांना रोजी-रोटीचा मोठा आधार मिळतो. यात्रा परिसरासह शहरातील दुकानांचाही व्यवसाय वाढतो. मागील अनेक वर्षांपासून हाच अनुभव येत आहे. उर्समुळे सामाजिक वातावरणही चांगले राहते. हिंदू-मुस्लीम एकता निर्माण करणारी ही यात्रा आहे.
- कांतिलाल कोठारी
अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स

Web Title: Employment for many because of Oars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.