दिग्रस नगरपरिषदेसमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण

By Admin | Updated: May 20, 2016 02:11 IST2016-05-20T02:11:34+5:302016-05-20T02:11:34+5:30

पदोन्नतीच्या मागणीसाठी येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे.

Employees' fasting in front of Digras municipal council | दिग्रस नगरपरिषदेसमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण

दिग्रस नगरपरिषदेसमोर कर्मचाऱ्यांचे उपोषण

पदोन्नतीची मागणी : इतर कर्मचारी करणार साखळी उपोषण
दिग्रस : पदोन्नतीच्या मागणीसाठी येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. तर इतर कर्मचारी टप्प्याटप्प्याने साखळी उपोषणास बसणार आहे.
दिग्रस नगरपरिषदेत २५ वर्षांपासून विविध विभागात लिपिकाचे व रोखपालाचे काम करीत आहे. त्यांना अद्यापही पदोन्नती दिली नाही. पदोन्नतीसाठी वारंवार निवेदन देण्यात आली, परंतु कारवाई केली नाही.
त्यामुळे राजेश विठ्ठल इंगोले, म. अल्ताफ शे. हनीफ आमरण उपोषणाला नगरपरिषदेसमोर बसले आहे. तसेच सुरेश नरळे, दीपक काळे, दत्ता भरारे, संतोष पाटील, अ. रहीम अ. अझीझ आदी कर्मचारी साखळी उपोषणात सहभागी होत आहे. पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलेल्या उपोषणाची नगरपरिषद काय दखल घेते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Employees' fasting in front of Digras municipal council