कळंब येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

By Admin | Updated: April 19, 2016 06:12 IST2016-04-19T06:12:53+5:302016-04-19T06:12:53+5:30

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्या मार्गी लागाव्या यासाठी येथील तहसील

Employees' demonstrations at Kalamb | कळंब येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

कळंब येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

कळंब : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्या मार्गी लागाव्या यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
अंशदान निवृत्ती वेतन योजना रद्द करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, लिपिक, लेखा संवर्गातील आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करावी, वाहन चालक व परिचर यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करावी, नोकर भरतीवरील सर्व निर्बंध रद्द करावे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या कराव्या, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा, कंत्राटी पध्दतीवर नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करावे, आयकर मर्यांदेत वाढ करावी आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.
यावेळी ओमप्रकाश गौरकार, राजेंद्र कठाळे, डॉ.मांडेकर, डॉ.तृप्ती वर्मा, डॉ.शिरभाते, कुकडे, अशोक ठाकरे, पंकज बरडे, पंकज वाईकर, शेषराव रामटेके, व्ही.जी. धाबे, डी.एन. वडुळकर, सावळकर, व्ही.आर. बळी, अतुल पद्मगिरवार, मोरेश्वर भोयर, विद्या सुरतकर, हेडाऊ, वासुदेव उताणे, खंडारे, नरेश भागडे, जावेद शेख, कन्हैया यादव आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: Employees' demonstrations at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.