कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सांगता
By Admin | Updated: November 2, 2015 01:55 IST2015-11-02T01:55:25+5:302015-11-02T01:55:25+5:30
होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सांगता
यवतमाळ : होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली. या कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले.
ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यवतमाळ तालुक्याच्यावतीने स्थानिक पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सभापती गौरीताई ठाकूर, गटविकास अधिकारी मानकर, ईश्वरकर, पंचायत विस्तार अधिकारी खाडे आदींनी या कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी समस्या मांडल्या. यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदींच्या हस्ते निंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ए.एम. हांडे यांच्या हस्ते बोरीगोसावी ग्रामपंचायतीचे कर्मचारी किशोर पुरी यांना अनुदानाचा धनादेश देण्यात आला. प्रसंगी तालुकाध्यक्ष मोरेश्वर आदमने, उपाध्यक्ष अमोल सहारे, सचिव अरुण मेंढे, माहुर तालुका सचिव दिलीप यवतकार, जिल्हा सचिव माधव कांबळे, पुंडलिक राठोड आदी उपस्थित होते.
या आंदोलनासाठी गजानन मसराम, मधुकर मोहुर्ले, संभाजी मरसकोल्हे, विलास जाधव, वामनराव पांदळे, रमेश राठोड, प्रदीप बोढाले, शिवाजी पाटील, देवराव नगराळे, भारत जाधव, लालसिंग राठोड, विष्णू आतराम, प्रशांत नगराळे, विष्णू मडावी, पद्माकर खोंड, ओमप्रकाश वाघमारे, दादाराव शिवणकर, लहुपाल काळे, अशोक मानकर, संतोष भलावी, किसन पवार, संतोष डोंगरे, संतोष थाटे, कैलास मेश्राम, किशोर भोयर, मारोती निमनकर, गुणवंत मडवे, राजेंद्र बोढाले, मुकिंदा फुपरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)