कल्याण निधीसाठी कर्मचारी आक्रमक
By Admin | Updated: November 6, 2016 00:12 IST2016-11-06T00:12:03+5:302016-11-06T00:12:03+5:30
जिल्हा परिषदेमध्ये १९७५ पासून सुरू असलेली कर्मचारी कल्याण निधी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहे.

कल्याण निधीसाठी कर्मचारी आक्रमक
पोलीस आयुक्तालयातील प्रकार : सीपींसमोर कारवाईचे आव्हान
अमरावती : शहर कोतवालीच्या हद्दीत जुगार उघड होतो, म्हणून पोलीस निरीक्षकांचे निलंबन, दहापेक्षा अधिक जण मुख्यालयी संलग्न, असे कारवाईचे आसूड ओढले जातात. मात्र, त्याचवेळी दोन पोलीस निरीक्षकांना झुकतेमाप का दिले जाते, असा प्रश्न पोलीस वर्तुळात उपस्थित झाला आहे.
अधिनस्थ यंत्रणेपैकी काहींना ‘सरळ’ करण्यासाठी पोलस आयुक्तांनी निलंबन, बदलीसह मुख्यालयी संलग्नतेसोबत अनेकांच्या वेतनवाढी रोखल्यात. अनेकांना शो-कॉज बजाविण्यात आल्यात. मात्र, दोन निरीक्षक या दंडात्मक कारवाईला अपवाद ठरले आहेत. या दोघांना झुकतेमाप का? याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. कारवाई न करण्यामागे त्या दोघांचे 'स्ट्राँग पॉलिटिकल कनेक्शन' कारणीभूत असल्याची ओरड आहे. पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बसणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाला त्याच्या मर्जीने ‘मलईदार’ पोलीस ठाणे दिले जाते. दुसऱ्याची एकाच महिन्यात दोनदा बदली होऊन त्याला आधीचेच पोलीस ठाणे मिळते तरी कसे, असा प्रश्न ‘खाकी’नेच उपस्थित केला आहे. दोघांपैकी एकाच्या हद्दीत तर दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तच गांजा पकडतात. ट्रक चोरीची तक्रार मिसिंग म्हणून नोंदविण्यास फिर्यादीवर दबाव टाकला जातो.
अवैध दारू आणि जुगार अड्डे राजरोसपणे चालविले जातात. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून काली-पिली अनधिकृतपणे धावतात. कुठलाही अवैध धंदा पोलिसांच्या मर्जीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे उघड वास्तव असताना संबंधित ठाणेदाराला साधी शो-कॉजही बजावली जात नाही. त्यामुळे, पोलीस आयुक्त या दोन ठाणेदारांवर ‘प्रशासकीय कारवाई’ करण्यास का मागे पुढे पाहतात, याची कारणमिमांसा होणे गरजेचे आहे.
याआधीही या ठाण्यातून अनेक तक्रारदारांना रिक्तहस्ते पाठविण्यात आले. आतासुद्धा ट्रक चोरीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या ठाणेदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याअनुषंगाने त्या निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
राजकीय हितसंबंध
दोन ठाणेदारांसह पोलीस आयुक्तालयातील अन्य एका पोलीस निरीक्षकांवर राजकीय वरदहस्त आहे. प्रसंगी या पॉलिटिकल कनेक्शनचा वापर करून तेच यंत्रणेवर भारी पडत असल्याचे चित्र क्लेशदायी आहे. शहराच्या एका सीमेशी लगट करणाऱ्या पोलीस ठाणेदाराविरुद्ध अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. गुन्हे शाखेत असताना या महाशयाने थेट खारतळेगाव, पुसद्यापर्यंत ‘कनेक्शन’ निर्माण केले होते. मात्र, बदनामी झाल्यानंतर राजकीय आडोशाला जाऊन स्वत:चे योग्य जागी पुनर्वसन करून घेतले. या राजकीय हितसंबंधांची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.