शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

मोहद्यात दारूविक्रीतून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा या गावात अवैध दारू विक्रीच्या विषयावरून मंगळवारी सकाळी चांगलाच राडा झाला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने गावातील एका इसमाला शिविगाळ करून मारहाण केल्यानंतर गावकरी संतापले. एसडीपीओ विजय लगारे यांना सरपंचांनी दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एसडीपीओंचे पथक व शिरपूर पोलीस तात्काळ ...

ठळक मुद्देदारूअड्डा केला उद्ध्वस्त : दारू विक्रेत्या माहिलेकडून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा या गावात अवैध दारू विक्रीच्या विषयावरून मंगळवारी सकाळी चांगलाच राडा झाला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने गावातील एका इसमाला शिविगाळ करून मारहाण केल्यानंतर गावकरी संतापले. एसडीपीओ विजय लगारे यांना सरपंचांनी दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एसडीपीओंचे पथक व शिरपूर पोलीस तात्काळ मोेहद्यात दाखल झाले. दारू अड्डा उद्ध्वस्त करून महिलेला अटक केल्यानंतर गावकरी शांत झाले.शुद्धमती शंकर लिंगरवार असे दारू विक्रेत्या महिलेचे नाव आहे. स्त्री असल्याचा फायदा घेत या महिलेने गेल्या अनेक दिवसांपासून मोहदा गावात दहशत पसरविल्याचे गावकरी सांगतात. दारू विक्रीला विरोध करणाऱ्यावर खोटे आरोप करून ही महिला त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावकरी कायम दहशतीत असतात. या परिसरात गिट्टी क्रेशरची संख्या मोठी असून त्यावर काम करणाऱ्या मजुरांना ही महिला दारू पुरविते. यामुळे गाव त्रस्त झाले आहेत. शिरपूर पोलिसांनी यापूर्वी तिच्याविरोधात अनेकदा कारवाया केल्या. परंतु कारवाईला न जुमानता ही महिला खुलेआम दारूविक्री करीत आहे.मंगळवारी सकाळी गावातील किशोर कुचनकार हा एका पानटपरीवर उभा असताना शुद्धमतीने त्याला अकारण शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. लगारे यांनी लगेच आपले पथक मोहद्याकडे रवाना केले. तसेच शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार यांनाही याबाबत सूचना केली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन शुद्धमतीला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या घराचा परिसराची ‘सर्चींग’ केली, तेव्हा बाजुलाच असलेल्या एका मातीच्या ढिगाऱ्यात दारूच्या शिशा लपवून ठेवल्या असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी या कारवाईत सहा हजार ५०० रुपयांची देशी दारू जप्त केली. कारवाईनंतर पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली. यापुढे दारू विकली जाऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर गावकरी शांत झाले. याप्रकरणी आरोपी शुद्धमतीविरुद्ध भादंवि ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एसडीपीओंच्या पथकातील आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष कालवेलवार, प्रिया डांगे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस