ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:47 IST2019-06-03T21:47:41+5:302019-06-03T21:47:53+5:30

ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने चर्चा आणि उपाययोजनांकरिता नागपूर येथे विदर्भस्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी संघर्षाची भूमिका मांडली.

Elgar for the overall development of the OBC community | ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एल्गार

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एल्गार

ठळक मुद्देविदर्भस्तरीय बैठक : भारतीय पिछडा शोषित संघटना, विविध मागण्यांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने चर्चा आणि उपाययोजनांकरिता नागपूर येथे विदर्भस्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी संघर्षाची भूमिका मांडली.
सार्वजनिक बाधंकाम विभागाचे मुख्य अभियंता धर्मराज रेवतकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रा. रमेश पिसे, सुनीता काळे, विलास काळे, संध्या राजुरकर, अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन कविटकर, पूर्व विभाग सहसचिव संजय देशमुख, राम वाढीभस्के, भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण सारवे, ईश्वर डुकरे, राष्ट्रीय प्रबोधनकार अरविंद माळी, शुभांगी घाटोळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळके, वंदना वनकर, अ‍ॅड. डब्ल्यू.एस. वासे आदींनी यावेळी ओबीसींच्या समस्या मांडल्या.
ओबीसींची देशव्यापी जनगणना, विभाजन, रोहिणी आयोगाची भूमिका व वास्तव, सारथी योजनेत ओबीसीचा समावेश आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रसंगी भानुदास केळझरकर, नरेश उन्हाळे, विनोद इंगळे, संजय वाघोळे, जी.एम. खान, अ‍ॅड. अनिल बांगरकर, प्रमोद शेरे, सुनील खडके, प्रफुल्ल गुल्हाने, बी.आर. सुर्वे, निकेश पिने, अंकित गुजरकर, हरिकिशन हटवार, रमेश राठोड, ज्ञानेश्वर मुगले, अ‍ॅड. राम दयान, हिरकणे आदी उपस्थित होते.

Web Title: Elgar for the overall development of the OBC community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.