शिक्षक बदली धोरणाविरुद्ध एल्गार
By Admin | Updated: June 18, 2017 00:55 IST2017-06-18T00:55:08+5:302017-06-18T00:55:08+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे,

शिक्षक बदली धोरणाविरुद्ध एल्गार
जिल्हा परिषद : १४ संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्या धोरणात दुरुस्त्या करण्यात याव्या, अवघड गावांचे निकष निश्चित करावे, या प्रमुख मागणीसाठी विविध १४ संघटनांनी शनिवारी एल्गार पुकारला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग घेतला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेपासून मुख्य मार्गाने मोर्चा तिरंगा चौकात पोहोचला. तेथे मुख्य समन्वयक मधुकर काठोळे, राजूदास जाधव आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे, प्राथमिक शिक्षक समितीचे ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे राजूदास जाधव, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनचे दिवाकर राऊत, शिक्षक सेनेचे रवींद्र कोल्हे, अ.भा.प्राथमिक शिक्षक संघाचे रमाकांत मोहरकर, शिक्षक परिषदेचे सतपाल सोवळे, पदवीधर व केंद्रप्रमुख सभेचे महेंद्र वेळूकर, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे कैलास राऊत, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शरद घारोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे किरण मानकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे मनीष राठोड, प्राथमिक शिक्षक संघटनेचे गजानन मडावी, उर्दू शिक्षक संघटनेचे हयात खान आदींचा समावेश होता.