अकरावी प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून आरंभ
By Admin | Updated: June 21, 2014 02:12 IST2014-06-21T02:12:36+5:302014-06-21T02:12:36+5:30
जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून आरंभ
यवतमाळ : जिल्हात दहावीचा निकाला ८३.८५ टक्के लागला असून तब्बल ३१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रत्यक्षात २५ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची क्षमता आहे. वाढलेल्या निकालाने विद्यार्थी प्रवेशाचा प्रश्न आहे. अशा स्थितीत सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यासाठी वाढीव तुकड्यांचा प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे देण्यात येणार आहे. या संदर्भात संचालकांनी बैठक बोलावली असून २७ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरूवात होणार आहे.
दहावीच्या गुण पत्रिकेचे शाळेतून २६ जून रोजी वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होत असल्याचे प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुरेशसिंग चव्हाण यांनी सांगितले. अतिरिक्त ठरत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात यावा असे निर्देश जिल्ह्यातील महाविद्यालय प्राचार्यांना दिले आहे. या संदर्भात १८ जून रोजी अभ्यंकर विद्यालयात शिक्षण विभागाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्ह्यातील २०० प्राचार्य उपस्थित होते. विद्यार्थी संख्या लक्षात घेता अकरावीच्या तुकडीतील पटसंख्या वाढविण्याचेही विचाराधीन असल्याने चव्हाण यांनी सांगितले.
उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या अकरावी तुकडीमध्ये ६० विद्यार्थी मर्यादा आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी तुकडीत ८० विद्यार्थी तर महाविद्यालयातील अकरावी तुकडीत १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
यावर्षी या प्रमाणात आणखी फे रबदल करण्यात येतील. गरज पडल्यास अकरावीच्या तुकड्या वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकापुढे ठेवण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत शिक्षण संचालकांच्या बैठकीत लवकरच तोडगा कढून प्रवेश प्रक्रियेपूर्वीच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यासाठी तातडीने निर्णय घेतला जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)