वर्धा नदीला पूर, बगाजी सागर चे उघडले अकरा दरवाजे

By Admin | Updated: July 5, 2016 18:13 IST2016-07-05T18:13:04+5:302016-07-05T18:13:04+5:30

बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़

The eleven doors opened by the Baghaishi Sea, flooding the Wardha river | वर्धा नदीला पूर, बगाजी सागर चे उघडले अकरा दरवाजे

वर्धा नदीला पूर, बगाजी सागर चे उघडले अकरा दरवाजे

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. ५ : धामणगाव(रेल्वे), (जि. अमरावती) बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़
अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणाची मुहूर्त मेढ १९७६ मध्ये झाली होती़ वर्धा जिल्ह्यातील २२ तर अमरावती जिल्ह्यातील सात गावांचे पुर्नवसन करण्यात आले होते़ आता या धरणातील पाणी उन्हाळ्यात अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या गावासाठी संजीवनी ठरत आहे़ दोन दिवसापासून सुरू असलेले पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे़ त्यामुळे १५४ घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विर्सग सुरू आहे़ अकरा दरवाजे २० सेंमी पर्यंत उघडले असल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़ वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा तालुका प्रशासनाने दिला आहे़ पावसाचे वाढणाऱ्या प्रमाणात जलसाठा संतुलीत प्रमाणात राहावा या करीता दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार असल्याची माहीती निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़जी़रब्बेवार यांनी दिली़

Web Title: The eleven doors opened by the Baghaishi Sea, flooding the Wardha river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.