हत्तींनी अवनीच्या बछड्याचा पाठलाग थांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:21 IST2018-12-27T20:20:56+5:302018-12-27T20:21:12+5:30
वन खात्याच्या गोळीचा निशाणा बनलेल्या अवनी या नरभक्षक पट्टेदार वाघिणीच्या नर बछड्याने गेले तीन दिवस काहीच न खाल्ल्याने वन्यजीव विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच वन खात्याने या बछड्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग पुढील तीन दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत थांबविला आहे.

हत्तींनी अवनीच्या बछड्याचा पाठलाग थांबविला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन खात्याच्या गोळीचा निशाणा बनलेल्या अवनी या नरभक्षक पट्टेदार वाघिणीच्या नर बछड्याने गेले तीन दिवस काहीच न खाल्ल्याने वन्यजीव विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच वन खात्याने या बछड्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग पुढील तीन दिवस अर्थात २९ डिसेंबरपर्यंत थांबविला आहे.
अवनीच्या मादी बछड्याला बेशुद्ध करून पकडल्यानंतर वन खात्याने नर बछड्याला पकडण्यासाठी लक्ष केंद्रित केले. ८० हेक्टर जंगलाला कुंपन घालण्यात आले. त्यात हा बछडा सुरक्षित आहे. चारही हत्ती त्याच्या मागावर सोडण्यात आले आहे. मात्र हत्तीला पाहून हा बछडा जंगलात सुसाट पळतो आहे. भीतीने गेली तीन दिवस तो दाट जंगलात लपून बसला आहे. तो कोणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्याने या तीन दिवसात काहीही खाल्लेले नाही. त्याची उपासमार वन खात्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. म्हणूनच त्याचा पाठलाग थांबवून पिंजऱ्यात त्याच्यासाठी शिकार बांधण्यात आल्याची माहिती वन अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.
अवनीच्या बछड्याची शोधमोहिम थांबविलेली नाही. केवळ त्याचा हत्तीद्वारे होणारा पाठलाग थांबविण्यात आला आहे.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.