वीज पोलमुळे रस्त्याची कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:20+5:30

वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते.

Electricity pole hampered road works | वीज पोलमुळे रस्त्याची कामे अडली

वीज पोलमुळे रस्त्याची कामे अडली

ठळक मुद्देमहावितरणची चालढकल : मागणी करूनही डिमांड देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेकडून वणी शहरात सुमारे २० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र मागणी करूनही रस्ता बांधकामात आडवे येत असलेले विजेचे पोल हटविण्यासाठी वीज वितरण कंपनी सहकार्य करीत नसल्याने रस्ता बांधकामात अनंत अडचणी येत आहेत.
वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते. नव्या रस्ता बांधकामात रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढून नगरपालिकेने रस्ता बांधकामाला सुरूवात केली. परंतु अनेक ठिकाणी विजेचे पोल उभे आहेत. रस्ता बांधकामापूर्वी ते काढण्यात यावे, त्यासाठी जी डिमांड लागेल ती भरण्याची तयारीदेखील नगरपरिषदेने दाखविली. परंतु वीज वितरण कंपनीने नगरपरिषदेला हवा तसा प्रतिसादच दिला नाही. वीज खांब काढले जात नसल्याचे पाहून कंत्राटदारांनी रस्त्याचे बांधकाम केले.
यासंदर्भात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना विचारणा केली असता, रस्ता बांधकाम सुरू करण्यापूर्वी आम्ही वीज खांब रस्त्यातून हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीला अनेकदा पत्र दिले. परंतु याविषयात वीज वितरण कंपनीने प्रतिसादच दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी नाईलाजाने रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे लागल्याचेही ते म्हणाले.
वणी शहरात चिखलगाव ते टिळक चौक, टिळक चौक ते वरोरा मार्गावरील दत्त मंदिर, तहसील चौक ते वरोरा रोड, देशमुखवाडीतील लायन्स इंग्लिश स्कूल ते आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे निवास, बसस्थानक ते रवीनगर या मार्गाचे बांधकाम करण्यात आले. यात अनेक ठिकाणी रस्त्यात पोल उभे आहेत. परिणामी अपघाताची शक्यता आहे.
एसपीएम शाळेजवळील राजीव गांधी चौक ते शिवनेरी चौक रस्त्याचे काम पोलमुळे अडून पडले आहे.

Web Title: Electricity pole hampered road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज