सरपंच निवडीतून दोन गटांत शस्त्राने हल्ला
By Admin | Updated: July 27, 2014 00:19 IST2014-07-27T00:19:01+5:302014-07-27T00:19:01+5:30
सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली.

सरपंच निवडीतून दोन गटांत शस्त्राने हल्ला
यवतमाळ : सरपंच निवडीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन कुऱ्हाड आणि लोखंडी सळाख चालली. त्यामध्ये दोन्ही गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिग्रस तालुक्यातील फेट्री येथे घडली. शंकर तोलाराम जाधव, विलास प्रल्हाद आडे आणि त्याचा भाऊ तिघेही रा. फेट्री अशी जखमींची नावे आहेत.
घटनेनंतर दोन्ही गटाच्यावतीने दिग्रस पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यामध्ये शंकर जाधव याच्या तक्रारीवरून विलास आडे आणि त्याचे तीन नातेवाईक तर विलास आडे याच्या तक्रारीवरून शंकर जाधव आणि त्याच्या तीन नातेवाईकांविरोधात प्राणघातक हल्ला, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली नव्हती. या संदर्भात स्थानिक पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी दोन्ही गटातील सदस्य हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र त्यांच्यात एका दुसऱ्या कुटुंबातील महिलेला सरपंच केल्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच कुऱ्हाड आणि सळाखीने त्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याचे सांगितले. गावातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रित झाल्याचेही ते म्हणाले.
(स्थानिक प्रतिनिधी)