शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

लोकसभा १९७७ ची निवडणूक; वसंतराव नाईक यांच्या ‘त्या’ भाषणाने फिरला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 1:24 PM

आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.

ठळक मुद्दे अर्ध्या तासात होत्याचे झाले नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात राळेगाव तालुक्यातील दोन दिग्गजांमध्ये चुरस होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या एका भाषणाने ‘त्या’ निवडणुकीचा निकाल फिरला होता.तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यानंतर देशाचे चित्रच पालटले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण, राजनारायण, चरणसिंग, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी त्यावेळी आणीबाणीविरुद्ध प्रचंड रान उठविले. परिणामी अनेकांना कारागृहात जावे लागले. विरोधकांनी प्रचंड राळ उठविल्याने काँग़्रेसविरूद्ध देशभर वातावरण तापले होते. दोन वर्षानंतर त्याच स्थितीत १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली होती.काँग्रेसविरोधी वातावरणामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये धाकधूक होती. त्यावेळी यवतमाळ लोकसभा मतदार संघात काँग्रेसने राळेगाव तालुक्यातील श्रीधरराव जवादे यांना उमेदवारी दिली. विरोधकांनीही त्यांच्याविरूद्ध राळेगाव तालुक्यातीलच नानाभाऊ एंबडवार यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. जवादे यांना ‘गाय-वासरू’, तर एंबडवार यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले होते. दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील असल्याने त्यांना एकमेकांची ‘उणी-दुणी’ चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे प्रचारात रंगत आली होती. आणीबाणीमुळे विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांची चांगलीच हवा झाली होती. ते विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.विरोधकांच्या आरोपांमुळे काँग्रेस उमेदवार अडचणीत आले होते. अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जवादे यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या आझाद मैदानात सभा लावण्यात आली. ‘त्या’ सभेत नाईक यांनी ‘माणूसकीची प्रयोगशाळा’ या विषयावर भाषण देताना चांगला पक्ष व चांगला उमेदवार कसा निवडावा, याबाबत मार्गदर्शन केले. मतदारांनी उमेदवाराचे बॅकग्राऊंड तपासावे. उमेदवाराची जनतेप्रती असलेली तळमळ लक्षात घ्यावी.पक्ष आणि उमेदवार जनतेचे हितकर्ते असावे, असे स्पष्ट केले. त्यांच्या या एका भाषणाने निवडणुकीचा नूरच पालटला अन् पराभवाच्या छायेत असलेले जवादे अखेर १२ हजार १९७ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. नाईक यांच्या एका भाषणाने निकाल फिरला होता. मात्र विरोधी उमेदवाराचे ‘होत्याचे नव्हते’ झाले होते.या निवडणुकीनंतर देशात काँगे्रसचा पराभव होऊन केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र अवघ्या अडीच वर्षांत हे सरकार कोसळले अन् जवादे यांची खासदारकी गेली. विशेष म्हणजे १९७७ च्या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विजयानंतर रॅली नाहीयवतमाळ मतदार संघात त्यावेळी श्रीधरराव जवादे यांना एक लाख ९२ हजार २२८ मते मिळाली होती. विरोधी उमेदवार नानाभाऊ एंबडवार यांना एक लाख ८० हजार ३१ मते मिळाली होती. १२ हजार १९७ मतांनी जवादे तरले होते. विजयानंतर काँग्रेसने विजयी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी काँग्रेस नेत्यांना तुम्ही जरी जिंकले असलात, तरी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्याची माहिती दिली. यामुळे काँग्रेसने विजयी मिरवणूक रद्द केली. दरम्यान, श्रीधरराव जवादे हे काँग्रेसमधील तत्कालीन बडे प्रस्थ शंकरराव चव्हाण यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातं. चव्हाण यांनीच जवादे यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविली होती. दुसरीकडे नानाभाऊ एंबडवार यांच्याबद्दल दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘आपुलकी’ होती. तथापि पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना जवादे यांच्या समर्थनार्थ सभा घ्यावी लागली होती. मतदारांनी त्यांचे भाषण ऐकून जवादे यांना निसटत्या फरकाने विजयी केले. एकूण नाईक यांच्या ‘त्या’ भाषणानेच ही निवडणूक गाजली अन् त्यांचा उमेदवारही निवडून आल्याची आठवण या निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या एका ज्येष्ठ माजी लोकप्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक