पांढरकवडा तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक
By Admin | Updated: April 2, 2015 00:10 IST2015-04-02T00:10:13+5:302015-04-02T00:10:13+5:30
येत्या मे ते जुलै दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींची २२ एप्रिलला निवडणूक होत आहे.

पांढरकवडा तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक
पांढरकवडा : येत्या मे ते जुलै दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींची २२ एप्रिलला निवडणूक होत आहे. त्यासाठी तहसीलदार शैलेश काळे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अधिसूचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज स्विकारणे सुरू झाले आहे. ही प्रक्रिया ७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यात केळापूर, सखी बु., पाथरी, सायखेडा, अडणी, मोहदरी, सिंगलदीप, वाई, पिंपरी रोड, साखरा बु., किन्ही नंदपूर, वृंदावन टाकळी, सोनुर्ली, कोंघारा, पहापळ, चालबर्डी, घोन्सी, कारेगाव-रामपूर, सोनबर्डी, साखरा खुर्द, कवठा, वांजरी, चनाखा, कोदोरी, ढोकी रोड, रूढा, चिखलदरा, मांगुर्डा, कोपामांडवी, वाऱ्हा, घुबडी, सुन्ना, पिंपळखुटी या ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक २२ एप्रिलला होणार आहे.
मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला मतमोजणी होईल. एल.यू.चांदेकर हे केळापूर, घोन्सी, पिंपरी रोड, पहापळ, कोंघारा ग्रामपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी आहे. ए.यू. गुघाणे यांच्याकडे चालबर्डी, सोनबर्डी, साखरा बु., मांगुर्डा, पाथरी, विजय दावडा यांच्याकडे सखी बु., सायखेडा, मोहदरी, वृंदावन टाकळी, बी.एन. जाधव यांच्याकडे अडणी, सिंगलदीप, किन्ही नं., सोनुर्ली, एस.पी. गिरी यांच्याकडे कारेगाव, रामपूर, साखरा खु., वाई, चिखलदरा आणि वांजरी, पी.टी. राके यांच्याकडे सुन्ना, पिंपळखुटी, ढोकी रोड व रूढा, तर भाऊ चव्हाण यांच्याकडे घुबडी, चनाखा, कोदोरी, कवठा, वाऱ्हा, कोपामांडवी ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. एच.डब्ल्यू. शिरभाते राखीव निवडणूक निर्णय अधिकारी आहे. येथील तहसील कार्यालयात सध्या उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व सादर करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते तसेच ईच्छुकांची गर्दी होत आहे. निवडणूकीची तारीख जवळ येत असल्याने ग्रामीण भगाता निवडणूक ज्वर चढला आहे. (शहर प्रतिनिधी)