भीसी व्यवसायात आठ कोटीने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:07+5:30

भीसीच्या या व्यवसायात आठ कोटी रुपयांचा घोळ घातला गेला आहे. भीसीची ही रक्कम त्यातील सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना देणे टाळले जात आहे. या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे बुडलेल्या या आठ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी आता या भीसी व्यवसायातही गुन्हेगारांचा शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे.

Eight crore fraud in VC business | भीसी व्यवसायात आठ कोटीने फसवणूक

भीसी व्यवसायात आठ कोटीने फसवणूक

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जाजू चौक मुख्य केंद्र, भागीदारीतील व्यवसाय, किराणा व्यापारी सूत्रधार

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील व्यापाऱ्यांची दरमाह कोट्यवधी रुपयांची भीसी चालविली जात असून त्यात व्यापाऱ्यांची आठ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
यवतमाळ शहरातील व्यापारी, व्यावसायिक भीसीमध्ये पैसा गुंतवितात. या भीसीचे मुख्य केंद्र हे गोदनी रोडवरील जाजू चौकात आहे. भागीदारीतून हा व्यवसाय चालविला जात असून एक किराणा व्यापारी याचे सूत्रधार आहेत. दरदिवशी १५ लाख ते दीड कोटी रुपयापर्यंत ही भीसी चालते. छोट्याशा कार्यालयात भीसीची ही सर्कस चालविली जाते. दररोज तीन ते चार भीसी उघडल्या जातात. या कार्यालयापुढे पार्किंगसाठी जागा नसल्याने तेथे अनेकदा भांडणेही होतात. लिलाव पद्धतीने ही भीसी काढली जाते. यवतमाळ शहरातील अनेक व्यापारी या भीसीचे घटक आहेत. या भीसीचे ‘मास्टर मार्इंड’ मात्र वेगळेच आहे. भीसी व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी अधिकृत रेकॉर्डवर हा सर्व व्यवहार झिरो आहे. अनधिकृतरीत्या रजिस्टरवर भीसीचे हे आकडे नोंदविले जातात. प्राप्तीकर खात्यासाठी ही भीसी आव्हान ठरली आहे.
भीसीच्या या व्यवसायात आठ कोटी रुपयांचा घोळ घातला गेला आहे. भीसीची ही रक्कम त्यातील सदस्य असलेल्या व्यापाºयांना देणे टाळले जात आहे. या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे बुडलेल्या या आठ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी आता या भीसी व्यवसायातही गुन्हेगारांचा शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रधाराकडे व्यापाऱ्याने पैशाची मागणी केल्यास उलट त्यालाच धमकाविण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत.

फायनान्सर कोण ?
व्यापारी वर्ग एकीकडे मंदीची लाट आहे, ग्राहकी नाही, व्यवसाय ठप्प आहे असे सांगत असताना त्यांच्याकडे भीसीसाठी मासिक चार ते पाच लाखांची रक्कम येते कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतविला जात असण्याची शक्यता आहे. यातील नेमके फायनान्सर कोण ? हे शोधण्याचे प्राप्तीकर खात्यापुढे आव्हान आहे. या व्यवसायात एकाच व्यक्तीच्या तब्बल प्रत्येकी एक लाखाच्या पाच ते दहा भीसी असण्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

Web Title: Eight crore fraud in VC business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.