उमरखेडमध्ये मुलींना शैक्षणिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST2021-03-16T04:42:16+5:302021-03-16T04:42:16+5:30
उमरखेड : जागतिक महिला दिनानिमित्त सत्य निर्मिती महिला मंडळ, सामाजिक कल्याण मानव संरक्षण व ग्लोबल फाउंडेशनतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. ...

उमरखेडमध्ये मुलींना शैक्षणिक मदत
उमरखेड : जागतिक महिला दिनानिमित्त सत्य निर्मिती महिला मंडळ, सामाजिक कल्याण मानव संरक्षण व ग्लोबल फाउंडेशनतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. त्यात निराधार मुलींना शैक्षणिक मदत देण्यात आली.
निराधार मुलींना शैक्षणिक मदत व रोजगारसाठी तसेच कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना संस्था मदत करते. कोविडमुळे यंदा नियम पाळून हा उपक्रम पार पडला. बाहेरगावातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात शहरात आली आहेत. नांदेड रोडवरील अशा कुटुंबांना जागतिक महिला दिनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांना कोरोनाकाळातील मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी महिलांना शिक्षण, स्वयरोजगार, महिला अधिकार, कायदे, सम्मानीत जीवन आदी विषयांवर मार्गदर्शनदेखील करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शबाना खान, कायदेशीर सल्लागार ॲड. मनीषा भारती, मुख्य सचिव सीमा खंदारे, उपाध्यक्ष राखी मंगरे, कार्यध्यक्ष सविता भागवत, युवा वाहिनी सदस्य स्वाती दुधे, सरिता फुलोरे व सर्व सदस्य उपस्थित होत्या.