शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या दीपालीने पाेलिसी हिसका दाखविताच खुनाची कबुली दिली. मात्र खून नेमका कसा केला, हे सांगताना तिने पोलिसांना चक्रावून टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तीनवर्षीय मानवी नावाच्या बालिकेचा खून करणारी काकू दीपाली चोले हिला अटक करण्यात आली असून, तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खुनाच्या कबुलीत तिने पोलिसांपुढे केलेल्या बेछूट वक्तव्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे; तर फॉरेन्सिक तज्ज्ञांना दीपालीच्या घरात आढळलेल्या वस्तूंवरून या खुनाला अंधश्रद्धेसह अनैतिक संबंधांचीही किनार असल्याचा संशय व्यक्त केला. तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या दीपालीने पाेलिसी हिसका दाखविताच खुनाची कबुली दिली. मात्र खून नेमका कसा केला, हे सांगताना तिने पोलिसांना चक्रावून टाकले. कधी मानवीला गळा दाबून मारले, तर कधी पाण्यात बुडवून मारल्याचे ती सांगत आहे; तर दुसरीकडे, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तिच्या घरात केलेल्या तपासातून वेगळीच बाब पुढे आली आहे. फॉरेन्सिकच्या अहवालानुसार मानवीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला. दीपालीने सात दिवस मानवीला गव्हाच्या कोठीत ठेवले होते, हे विशेष. पोलिसांनी दीपालीविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी आर्णी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात  एसडीपीओ आदित्य मिरखेलकर, ठाणेदार पितांबर जाधव, एलसीबी पीआय प्रदीप परदेशी या प्रकरणातील विविध बारकावे शोधत आहेत. पीएसआय भगवान पायघन,   एपीआय किशोर खंदार, विवेक देशमुख, मीनाक्षी सावळकर, दिनेश जाधव, मनोज चव्हाण, सतीश चौधर, अमित झेंडेकर, गोपनीय विभागाचे अरुण राठोड तपास करीत आहेत.

चक्क दारूत शिरा शिजवून केली पूजा- सोमवारी दिवसभर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दीपाली चाेले हिच्या घरात बारीकसारीक पुरावे गोळा केले. यावेळी दीपालीने दारूमध्ये शिरा शिजवून महालक्ष्मीच्या फोटो पुढे झेंडूची फुले ठेवल्याचे आढळले. तसेच घरात चारही बाजूंनी गहू शिंपडलेले आढळून आले. त्यामुळे चिमुकल्या मानवीचा अंधश्रद्धेतून बळी घेतला गेला का, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

नवरा दारूडा, म्हणे भासऱ्याचा हाेता त्रास- मानवीचे वडील अविनाश चोले हा आपल्याला नेहमी त्रास देत होता. छेडछाड करीत होता, असा आरोप पोलीस कोठडीत असलेल्या दीपालीने केल्याचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी सांगितले. तर दीपालीचा नवरा गोपाल दारूडा असल्याने दीपाली त्याच्यापासून रात्री वेगळी राहायची, अशीही माहिती दीपालीनेच पोलिसांना दिली. त्यामुळे मानवीच्या हत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी