भूमिपूजनाचा सपाटा; खड्ड्यांकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: September 3, 2014 23:45 IST2014-09-03T23:45:49+5:302014-09-03T23:45:49+5:30

वणी उपविभागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे़ रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ रस्त्यावर पाण्याचे तळे तयार झाले आहे़ हे खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाला सवड नाही़ मात्र

Earthquake; Ignore the potholes | भूमिपूजनाचा सपाटा; खड्ड्यांकडे दुर्लक्ष

भूमिपूजनाचा सपाटा; खड्ड्यांकडे दुर्लक्ष

वणी : वणी उपविभागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे़ रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ रस्त्यावर पाण्याचे तळे तयार झाले आहे़ हे खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाला सवड नाही़ मात्र उपविभागात भूमिपूजनांचा सपाटा सुरू आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दैनावस्था झाली़ उपविभागातील रहदारीचा एकही प्रमुख मार्ग वाहतूकीस योग्य नाही़ वणी-कोरपना, वणी-पाटण, वणी-घोन्सा, वणी-वरोरा या मार्गावर दोन-चार फूट खोलीचे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही़ त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहन चालविणेसुध्दा धोकादायक ठरत आहे़ वर्षभरापासून ही स्थिती असताना बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही़ रस्ते दुरूस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला नाही़ मात्र निवडणुक तोंडावर आली असताना नवीन कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे़ एकाच दिवशी ७-८ तासात ३०-४० कामांचे भूमिपूजन उरकविले जात आहे. केवळ १५ मिनीटे ते अर्धा तासाच्या अंतराने भूमिपूजनाचे ठिकाण बदलत आहे़ एवढ्या वेळात एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी एवढ्या जलद कोणत्या वाहनाचा वापर केला जातो, हे समजायला मार्ग नाही़ गत १५ दिवसांत १५०-२०० कामांचे भूमिपूजन झाले असावे, यापैकी बहुतेक कामांना केवळ प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असल्याचे समजते़
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Earthquake; Ignore the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.